हनिमूनच्या रात्री नवरी जोमात अन् नवरा कोमात ! 'ते' सीक्रेट बाहेर आलं..नवरीने बाल्कनीतून उडी मारली अन् नको ते घडलंच..
Groom And Bride Shocking Viral News : राजस्थानच्या जोधपूरमध्ये बिहारच्या नवरीनं मोठं कांड केलं आहे. तिने आधी पैसे घेऊन तरुणासोबत लग्न केलं. हनिमूनच्या दोन दिवसानंतर जेव्हा पतीला त्याच्या पत्नीचं सीक्रेट कळलं, तेव्हा नवरीने त्याला रुममध्ये बंद केलं होतं.

बातम्या हायलाइट

नवऱ्यासोबत हनिमून एन्जॉय केल्यानंतर नवरीनं केलं भयंकर कृत्य

नवरीने बाल्कनीतून उडी मारली अन् नंतर असं काही घडलं

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बातमी
Groom And Bride Shocking Viral News : राजस्थानच्या जोधपूरमध्ये बिहारच्या नवरीनं मोठं कांड केलं आहे. तिने आधी पैसे घेऊन तरुणासोबत लग्न केलं. हनिमूनच्या दोन दिवसानंतर जेव्हा पतीला त्याच्या पत्नीचं सीक्रेट कळलं, तेव्हा नवरीने त्याला रुममध्ये बंद केलं होतं. ती तिथून पळून गेली. नवरीने साडीची रस्सी बनवली आणि ती रस्सी बाल्कनीला बांधली. त्यानंतर साडीच्या रस्सीला धरून तिने बाल्कनीतून उडी मारली. पण होत्याचं नव्हतं झालं. नवरीचे दोन्ही पाय तुटले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिने पोलिसांना तिच्या संपूर्ण टोळीबाबत सांगितलं. ही टोळी लग्नाच्या नावाखाली सामान्य लोकांची फसवणूक करतात.
ही धक्कादायक घटना बनाड पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथील भरत नावाच्या तरुणाने लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली आहे. पीडित व्यक्तीने 23 वर्षीय चोरटी नवरी सुमनसह 6 लोकांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पीडित भरतने तक्रार दाखल करत म्हटलं, माझं लग्न होत नव्हतं. तेव्हा वडिलांच्या ओळखीचे नंदकिशोर सोनी यांनी 27 जून रोजी फोनवर आश्वासन दिलं.
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
चांगल्या मुलीसोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर बिहारमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीसोबत लग्नाचं नातं जुळवलं. सोनी यांच्या ओळखीचे दोन व्यक्ती संदीप शर्मा आणि रवी नावाचा तरुण दोन मुलींना घेऊन आला होता. एकीचं नाव सुमन होतं, तर दुसऱ्या तरुणीचं नाव रुबी पांडे होतं. मला सुमंत पसंत आली होती. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये देण्यात येतील. कारण या लग्नात इतका खर्च येईल, असं ते म्हणाले.
हे ही वाचा >> 'प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांचे हजारो नग्न फोटो, मोलकरणीचे देखील...', रुपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा
भरतने म्हटलं, आम्ही 1 लाख 17 हजार रुपये रोख रक्कम आणि 1 लाख 30 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर माझं लग्न सुमनसोबत लावण्यात आलं. पण दोन दिवसानंतर मला सुमनच्या कारनाम्याबाबत कळलं की, ती एक चोरटी आहे. त्यानंतर आमच्यात वादविवाद सुरु झाले. त्याचदरम्यान, सुमनने मला रुममध्ये बंद केलं. त्याननंतर तिने साडीची रस्सी बनवली. ती बाल्कनीतून जशी खाली पडली, तिचे दोन्ही पाय तुटले. रवी आणि संदीप दोघेही तिला सोबत नेण्यासाठी तिथे उभे होते. मी तेव्हा आरडाओरडा केला. तेव्हा घरातील लोक जागे झाले. रवी आणि संदीप त्यानंतर नवरीला सोडून पळून गेले आणि माझ्या घरच्यांनी तिला पकडलं.
त्यानंतर सुमनला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिने अनेकदा तिच्या वडिलांचं खोट नाव सांगितलं. त्यानंतर उघडकीस आलं की, ती आधीपासून विवाहित आहे. तेव्हा या गँगचा पर्दाफाश झाला. नवरी सुमन पांडे औरंगाबाद बिहारची रहिवासी असल्याचं बोललं जात आहे. तर संदीप शर्मा कौशांबी उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. दरम्यान, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.
हे ही वाचा >> 'प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांचे 'ते' नग्न फोटो, मोलकरणीचे देखील...', रुपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा