पोटच्या पोरानं आईची केली हत्या! उसाच्या शेतात मृतदेह पुरला अन् स्वत:लाही संपवलं, हत्येमागचं कारण जाणून पोलिसही हादरले!

Shocking Murder Case : लातूरच्या रेनापूर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शेत जमीन व्रिक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली.

गुन्हा
पत्नीची आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार. (प्रतिकात्मक चित्र)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलाने रागाच्या भरात आईची केली हत्या

point

पुरावे नष्ट करण्यासाठी शेतात मृतदेह पुरला

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

Shocking Murder Case : लातूरच्या रेनापूर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शेत जमीन व्रिक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन स्वत:लाही संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीविरोधात हत्येच्या गुन्ह्याची नोंद केलीय. सांगवीत दोघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, सांगवीत राहणारा 40 वर्षीय काकासाहेब वेणुनाथ जाधवने गुरुवारी सायंकाळी जवळपास 4.30 वाजताच्या सुमारास रेनापूर पिंपलफाटा येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. पण हे प्रकरण इथेच संपलं नाही.

तर काही तासानंतर म्हणजे जवळपास 9 वाजताच्या सुमारास गावातील शेतातच त्यांच्या 80 वर्षांच्या आईचा समिंद्रबाई जाधव यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आणि शुक्रवारी कुटुंबियांकडे सुपूर्द केले. त्यानंतर गावात दोघांवरही एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे ही वाचा >> ड्रग्स प्रकरणातील आरोपीकडून भाजप मंत्र्यांचं स्वागत, बावनकुळे म्हणतात.. 'वाजवा टाळ्या' त्या Video ची A टू Z स्टोरी

मुलाने रागाच्या भरात आईची केली हत्या

तपासात समोर आलं आहे की, काकासाहेब त्यांच्या आईसोबत शेती विकण्याबाबत बोलत होते. पण समिंद्रबाईंनी विरोध करत होती. याचाच राग मनात धरून आरोपी काकासाहेबने त्याच्या आईचा गळा दाबून तिची हत्या केली.

पुरावे नष्ट करण्यासाठी शेतात मृतदेह पुरला

हत्येनंतर काकासाहेबने त्यांच्या आईचा मृतदेह उसाच्या शेतात पुरला. जेणेकरून कोणाला माहित होणार नाही. पण काही तासानंतर त्याने स्वत:ला गळफास लावून जीवन संपवलं. पोलिसांनी आता याप्रकरणी आरोपी काकासाहेब जाधव याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा >> 'दिल्लीत दोघेजण भेटले आणि त्यांनी 160 जागांची गॅरंटी दिली अन्...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

हे वाचलं का?

    follow whatsapp