Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात बदल, पारा घसरणार; IMD चा अलर्ट

Maharashtra Weather : बहुतांश ठिकाणी मध्यरात्री ते पहाटे हवामानात गारवा जाणवेल अशी शक्यता आहे, तर दुपारी उन्हाची शक्यता आहे, अशातच जाणून घ्या एकूण राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात दररोज काही प्रमाणात हवेत बदल

point

जाणून घ्या एकूण राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather : राज्यात दररोज काही प्रमाणात हवेत बदल जाणवू लागला आहे. 15 नोव्हेंबरनंतर अधिकच फरक जाणवू लागला आहे. बहुतांश ठिकाणी मध्यरात्री ते पहाटे हवामानात गारवा जाणवेल अशी शक्यता आहे, तर दुपारी उन्हाची शक्यता आहे, अशातच जाणून घ्या एकूण राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

हे ही वाचा : प्रेयसीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

कोकण

कोकणातील मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी परिसरात थंडावा कमी जाणवेल. दिवसा ऊन आणि मध्यरात्री ते पहाटे गारवा जाणवेल. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात पुणे शहर आणि परिसरात बुधवारी आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. पहाटे वातावरण थंड, तर दुपारी हवामान तुलनेनं उबदार राहील. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत थंडीचा अधिक प्रभाव जाणवेल. दिवस रात्रीच्या हवामानात बदल जाणवेल. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत बुधवारी पावसाचा अंदाज नाही. तसेच हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. याच भागांत पहाटे आणि दुपारी वातावरणात फरक जाणवेल. पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात वातावरण सामान्य असेल. दुपारी मात्र उन्हाचा चटका आणि मध्यरात्री थंडावा जाणवेल अशी हवामान विभागाचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : Mumbai Local Train Crime : प्रवाशांमधील वादातून 53 वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला, Video व्हायरल

विदर्भ 

विदर्भात हवामान विभागाने कोणताच अलर्ट वर्तविलेला नाही. तसेच वातावरण कोरडं असण्याची शक्यता आहे.