Maharashtra Weather : ऐन दिवाळी सणाला पावसाचं सावट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Weather : दिवाळी सणातच पावसाच्या परिस्थितीची शक्यता वर्तवली आहे. तर जाणून घ्या 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकूण पावसाचा अंदाज कसा असेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार

राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट

ऐन दिवाळी सणाला पावसाचं सावट
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 22 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. तर काही ठिकाणी मात्र, दिवाळी सणातच पावसाच्या परिस्थितीची शक्यता वर्तवली आहे. तर जाणून घ्या 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकूण पावसाचा अंदाज कसा असेल.
हे ही वाचा : मोदींचा भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर संजय राऊत यांची बोचरी टीका, म्हणाले, 'तात्या विंचू येऊन गळा दाबेल'
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी पालघर,ठाणे, मुंबईत कोरडं वातावरण असेल. तसेच रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच अहिल्यानगर या जिल्ह्यात कोरडं हवामान असेल. तसेच पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.