कोकण, रायगड, रत्नागिरीसह 'या' भागात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा 'या' भागांना येलो अलर्ट जारी

मुंबई तक

Maharashtra Weather Update : राज्यात यंदा 6 जून 2025 मध्ये मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल झाला. तसेच 10 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि काही प्रामाणात मराठवाडा आणि विदर्भात मान्सून दाखल होणार आहे. यामुळे 10 जून रोजी राज्याच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय राहणार असल्याची शक्यता.

ADVERTISEMENT

rain intensity will increase in 'these' areas including konkan, raigad, Ratnagiri and yellow Alert
rain intensity will increase in 'these' areas including konkan, raigad, Ratnagiri and yellow Alert
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मान्सूनचा 'या' भागाला येलो अलर्ट जारी

point

राज्यातील मान्सून अपडेट घ्या जाणून

Maharashtra Weather Update : राज्यात यंदा 6 जून 2025 मध्ये मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल झाला. तसेच 10 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि काही प्रामाणात मराठवाडा आणि विदर्भात मान्सून दाखल होणार आहे. यामुळे 10 जून रोजी राज्याच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

हेही वाचा : बहिणीच्या लग्नासाठी पै पै कमावले अन् ट्रेनमधून पडला, 28 वर्षीय तरूणाच्या कुटुंबावर काळाचा घाला

अशातच 10 जून रोजी हवेचा दाव हा 1006 ते 1008 हेक्टोपास्कल राहण्याची शक्यता असेल. ज्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस अपेक्षित असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

कोकण : 

महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकण किनारपट्टीतील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 10 जून रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये विशेषकरुन रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.  

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशकात 10 जून रोजी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. यातील पुणे आणि साताऱ्यात पावसाचा अधिक जोर असेल. तर या भागातील घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.

मराठवाडा आणि विदर्भ : 

दरम्यान, मराठवाड्यात 10 जूनपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी 30 - 40 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विदर्भात 10 जून रोजी तुरळक ठिकाणी हलका मान्सून अपेक्षित राहणार आहे. तर दुसरीकडे 11 ते 12 जूननंतर पावसाचा वेग चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. तर ढगाळ वातावरणाने काही प्रमाणात दिलासा मिळेल. 

हेही वाचा : लोणावळ्यात तरुणांनी भुशी डॅमचं कुंपण ओलांडलं, धपा धप मारल्या उड्या अन् नंतर गटांगळ्या खात...

याचदरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करण्यासाठी कोणतीही घाई करु नये असे आश्वासन दिले आहे. 10 ते 12 नंतर पावसाची परिस्थिती पाहूणच अंदाज घ्यावा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp