जंगलात हनिमूनसाठी गेले, पण नवविवाहित जोडप्यासोबत घडलं सर्वात भयंकर! पोलिसांनाही बसलाय हादरा..

मुंबई तक

Honeymoon Couple Viral News :  उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित कपल हनिमूनला सिक्किम येथे गेलं होतं.

ADVERTISEMENT

New Married Couple Honeymoon Viral News
New Married Couple Honeymoon Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सिक्किमला हनिमूनला गेलेल्या कपलसोबत घडलं तरी काय?

point

शेर बहादूर सिंह तातडीनं सिक्किमला पोहोचले आणि..

point

इंदौरच्या कपलसोबतही घडलं भयंकर..

Honeymoon Couple Viral News :  उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित कपल हनिमूनला सिक्किम येथे गेलं होतं. पण त्यांच्या या जीवनप्रवासात दु:खद घटनेचं वळण लागलं. रहाटीकर गावातील रहिवासी कौशलेंद्र सिंह आणि त्याची पत्नी अंकिता सिंह 24 मे रोजी सिक्किमला रवाना झाली होती. 29 मे रोजी संध्याकाळी त्यांची टॅव्हलर व्हॅन मगन जिल्ह्यात 1000 फूट खोल दरीत कोसळली.

वाहनासोबतच ते नदीत वाहून गेले, पण अजूनही त्यांचा पत्ता लागला नाहीय. दरम्यान, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दर दोन जण जखमी आहेत. तसच कौशलेंद्र आणि अंकितासह 8 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेनंतर एनडीआरफच्या टीमकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. परंतु, खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत असल्याचं समजते. 

हे ही वाचा >> ईदच्या दिवशी बकरी नव्हे, स्वत:च्याच मानेवरून फिरवला चाकू..यामागचं कारण वाचून हादरूनच जाल!

शेर बहादूर सिंह तातडीनं सिक्किमला पोहोचले आणि..

कौशलेंद्र आणि अंकिताचं लग्न 5 मे रोजी झालं होतं. या घटनेमुळं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. शेर बहादूर सिंह (कौशलेंद्रचे वडील) त्यांच्या कुटुंबियांसोबत सिक्किमला पोहचले आहेत. स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून दोघांचाही शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

सिक्किमच्या हॉटेलमधून या कपलचं सामान ताब्यात घेण्यात आलं आहे. कुटुंबियांनी उत्तर प्रदेश आणि सिक्किम सरकारला आवाहन केलं आहे की, सर्च ऑपरेशन वेगाने सुरु करावं. जेणेकरून एखादा पुरावा सापडेल. घटना घडल्यानंतर जवळपास 8 दिवसानंतरही कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नाहीय. कौशलेंद्र आणि अंकिता कुठे आहेत? हा सवाल आता उपस्थित होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp