Manoj Jarange : ओबीसी नेत्यानेच ‘सगेसोयरे’ गोंधळ केला दूर, सांगितलं खरं काय?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

manoj jarange patil maratha reservation sage soyare word obc babanrao taywade obc reservation
manoj jarange patil maratha reservation sage soyare word obc babanrao taywade obc reservation
social share
google news

Babanrao Taywade reaction on Maratha Reservation : योगेश पांडे, नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj jarange Patil) सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आणि सगेसोयरे बाबतची अधिसूचना देखील काढली आहे. त्यामुळे मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. या यशस्वी आंदोलनावर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सगेसोयरे’ ही जुनीच मागणी आहे आणि अधिसूचनेत कुठलीही नवीन गोष्टी नमूद नाही. त्यामुळे आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही. मग आम्ही आता मुंबईकडे कूच करण्याचे कारण नाही. आम्ही समाधानी आहोत, असे बबनराव तायवाडे स्पष्ट केले आहे.(manoj jarange patil maratha reservation sage soyare word obc babanrao taywade obc reservation)

मराठ्यांच्या यशस्वी लढ्यानंतर मुंबई तकने ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याशी बातचीत केली. यावेळी मनोज जरांगेंच्या या यशस्वी आंदोलनावर बोलताना तायवाडे म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत आणि ओबीसींच्या हक्कांना धक्का न लावत सरकारने सुवर्णमध्य मार्ग काढला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेच धक्का बसत नाही. त्यामुळे आम्हाला मुंबईकडे कूच करण्याचा प्रश्नच येत नाही, असे तायवाडे म्हणाले.

हे ही वाचा : Manoj Jrange: मराठा आरक्षणाचा घोळ सुटला का?, जरांगेंना दिलेल्या अधिसूचनेत नेमकं काय?

तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले गेले नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिले गेले नाही.त्यामुळे आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही. मग आम्ही आता मुंबईकडे कूच करण्याचे कारण नाही. आम्ही समाधानी आहोत, असे बबनराव तायवाडे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान सध्या जी प्रचलित पद्धत आहे, आजोबा, पणजोबा आणि वडील यांच्या महसूली आणि शैक्षणिक कागदपत्रावर जी जात असते, ती जात ग्राह्य धरून त्यांच्या मुलांना आणि नातवांना जातीचे आणि ओबीसींचे प्रमाणपत्र मिळणार आहे. जीआरमध्ये तोच शब्दप्रयोग वापरलाय. यामध्ये ओबीसी समाजाचे काहीही नुकसान नसल्याचे बबनराव तायवाडे सांगतात. तसेच सगेसोयरे ही जी मागणी होती ती जुनीच मागणी आहे. त्यामुळे जीआरमध्ये कुठलीही नवीन गोष्टी नमूद नाहीत. सरकारने जो अध्यादेश काढला आहे, त्याच्यामध्ये कोणताही नवीन गोष्टीचा समावेश नाही, असे देखील बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आमच्या कुठल्याच आरक्षणाला धक्का लागला नाही. आम्ही जैसे थेच आहोत. त्यामुळे आम्ही सरकारचे आभारी आहोत, असेही तायवाडे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Manoj Jarange Live : जरांगेंनी उपोषण सोडलं, फडणवीस म्हणाले…

सरकारने 29 सप्टेंबर 2023 ला आम्हाला जे लेखी आश्वासित केले होते. त्यामध्ये सरकारने जो शब्द दिला त्याला कुठेही गदा येत आहे किंवा धोका पोहोचत आहे. त्यावेळी आम्ही कुच करणार होतो. पण आता ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का पोहचला नाही आहे. त्यामुळे मुंबईकडे कूच करण्याची गरज नाही, असे देखील बबनराव तायवाडे यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT