Manoj Jarange : 'बाया धरणारा तू...', शिंदे-फडणवीसांचा उल्लेख, बारसकरांबद्दल जरांगेंचे गौप्यस्फोट

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

अजय महाराज बारसकरांबद्दल मनोज जरांगेंनी काय सांगितलं?
Manoj Jarange allegations on ajay Baraskar maharaj
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे पाटील विरुद्ध अजय बारसकर महाराज

point

जरांगे पाटलांचे बारसकरांवर गंभीर आरोप

point

शिंदे-फडणवीसांचा उल्लेख करत दिला इशारा

Manoj Jarange Patil Ajay Baraskar : अजय बारसकर महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्या आरोपांना मनोज जरांगेंनी उत्तर देताना मोठे गौप्यस्फोट केले. मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा उल्लेखही यावेळी केला. 

ADVERTISEMENT

मनोज जरांगे यांचे अजय बारसकर यांच्याबद्दल स्फोटकं विधानं

1) "तो विकत घेतलेला आहे. तो ट्रॅपमधला आहे. मी जनतेला मायबाप मानायला नको का? आई बहीण मानायला नको का? तू महिलांवर बलात्कार करतो, असं तुझ्या गावचे लोक सांगायला लागले आहेत. हा ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि यात देवेंद्र फडणवीसांचा एक बडा नेत आहे."

2) "ज्या कोणत्या महिलेचा विनयभंग झाला आहे, ते प्रकरण दाबलं गेलं आहे. तू (अजय बारसकर) जरांगेंच्या विरोधात बोल नाही, तुझं ते उघड करू. असं त्याला सांगितलं आहे. तो बच्चू कडूंसोबत येत होता."

हे वाचलं का?

3) "ज्याला सोशल मीडियावरही कुणी गिनत नाही, त्याच्यासोबत बोलण्यासाठी मुंबईतील चॅनेल तयार झाले. सरकारचा हात असल्याशिवाय हे होऊ शकतं का? ज्याच्या कुत्रं मू## नाही. त्याला एवढे चॅनेल उपलब्ध व्हायला लागले?"

4) "ज्या महिलेला न्याय मिळाला नाही बड्या नेत्यामुळे... मी सांगतो की, त्या ताईने येऊन सांगावं, तिला न्यायचं मिळेल. बड्या नेत्यामुळे तिच्यावर अन्याय झाला असेल, तर न्याय देण्याची जबाबदारी आमची.

ADVERTISEMENT

5)"त्याची लय भयाण माहिती रात्रीपासून आली आहे. थोडं थांबा. याने इतके लफडे आणि कुटाणे केलेले आहेत. याने कुठल्यातरी संस्थानाखाली पैसे गोळा केले. याचं पहिलं गाव वेगळं आहे, तो तिथून भिशी घेऊन पळून गेलेला आहे. दुसऱ्या गावात जाऊन त्याने दोन नंबरचे धंदे केले आहेत. त्यामुळे तो असाच मरणार आहे. 

ADVERTISEMENT

6) जरांगेंवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांसाठी मरतो म्हणायचं. तू तुकाराम महाराजासाठी मरत नाहीये. तू जर महाराज आहे, तर मागच्या दहा वर्षाच्या काळात वारकरी धर्माला इतक्या घाण शिव्या दिल्या, तेव्हा तू कुठे गेला होता? वाईट प्रचवनं झाली, तेव्हा तू कुठे गेला होता?

7) हे बच्चू भाऊंसोबत हे वह्या घेऊन पळत होतं कुत्र पळाल्यासारखं. म्हणलं तू मध्यस्थीला, व्याख्या द्यायला तुम्ही होते. तुम्ही वाशीत चर्चा करायला आणि वारीत चालायला हवं होतं. तुम्ही गेले कुठे... तू झोपला होता का इतके दिवस... उठ व्यासपीठाच्या खाली हो, असं मी म्हणालो. 

8) सरकारच्या आडून वचवच बंद कर. तू नाटक करू नको. तुझ्यामुळे मराठ्यांमध्ये दुही पडू शकत नाही. माझ्या कुटुंबाबद्दल बोलला ना... तू कुणाचं खातो हे आम्हाला चांगल माहिती आहे. 

9) "तू बाया धरणारा... तू आई मानू शकत नाही. आईबद्दल, बहिणीबद्दल काय नियत असणार आहे तुझी? तू आम्हाला शिकवू नको. एक बंगळुरूची माताही येणार आहे. त्याने (अजय बारसकर) तिला काय केलं म्हणून... चाळीस लाख घेतले असंही कळलंय. माझे १९ वर्षे गेली तरी चॅनेल उपलब्ध झाले नाही, याला एका दिवसात कसं उपलब्ध झाले." 

10) "सरकारला सांगतो... तो ज्या नेत्यामागे पळतोय त्यालाही सांगतो... शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे त्याच्यामागे त्यालाही सांगतो... बडा नेत्यालाही सांगतो... तुम्ही जर याला साथ दिली तर तुमच्या पक्षाचे वाटोळं होणार आहे." 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT