shree siddhivinayak trust : सदा सरवणकरांना ‘गिफ्ट’! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Shree Siddhivinayak Temple Trust : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Shree Siddhivinayak Temple Trust Chairman Marathi News : शिवसेनेचे आमदार सदानंद सरवणकर यांना शिंदेंना दिलेल्या साथीचं अखेर फळ मिळालं आहे. सदा सरवणकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी चर्चा झाली, मात्र त्यांना स्थान मिळालं नाही. अखेर राज्यमंत्री दर्जाचं पद त्यांना मिळालं आहे. शिंदे सरकारने श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती केली आहे. (MLA Sada Sarvankar Appointed as chairman of Shree Siddhivinayak temple trust)
ADVERTISEMENT
श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाबद्दल शिंदे सरकारने निर्णय घेतला. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदा सरवणकर शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आहेत.
हेही वाचा >> Chhagan Bhujbal : ‘…म्हणून तुमचा तिळपापड झालाय’, मनोज जरांगे भुजबळांना भिडले
हे वाचलं का?
सदानंद सरवणकर यांची श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे शासनाचे पत्र.
जुलैमध्ये संपला होता आंदेश बांदेकरांचा कार्यकाळ
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या आदेश बांदेकरांकडे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात म्हणजे जुलै 2017 मध्ये आदेश बांदेकर यांची श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Shiv Sena : उद्धव ठाकरेंना म्हणाले ‘लुटारू’, उदय सामंतांचा व्यंगचित्रातून वार
जुलै 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांची पुन्हा अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती करण्यात आली होती. तो कार्यकाळ जुलै 2023 मध्ये संपला होता. तेव्हापासून ते प्रभारी म्हणून सिद्धीविनायक मंदिर न्यासच काम बघत होते.
ADVERTISEMENT
बांदेकरकडे ठाकरेकडे, सरवणकर शिंदेंकडे
एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर आमदार सदा सरवणकर हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात गेले. तर आदेश बांदेकर हे ठाकरेंसोबत राहिले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सदा सरवणकर मंत्री होऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती, पण त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. अखेर त्यांची राज्यमंत्री दर्जा असलेल्या सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT