Chhagan Bhujbal : ‘…म्हणून तुमचा तिळपापड झालाय’, मनोज जरांगे भुजबळांना भिडले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservatiom obc reservation cm eknath shinde
manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservatiom obc reservation cm eknath shinde
social share
google news

Manoj Jarange Patil Reply Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय. त्यामुळे आरक्षण संपवण्याचा घाट सुरु असल्याचा आरोप ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. या आरोपावर आता जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्य समोर मांडल्यामुळे तुमचा तिळपापड झालाय. मराठे जर सगळेच कुणबी निघाले तर आपण खातोय तेच जातंय की काय, तुम्ही एकस्ट्रा खाताय तेच जातंय, असा पलटवार जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) केला आहे. (manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservation obc reservation cm eknath shinde)

मनोज जरांगे पाटलांनी रूग्णालयातून प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यामुले ओबीसींच आरक्षण संपत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर जरांगे पाटील म्हणाले, ओबीसींचे आरक्षण संपणार कसे? मराठा समाजाच्या जे हक्काचं आहे, तेच आम्ही मागतोय. आम्ही कुठे गोळाबेरीज करतोय, असे जरांगे म्हणाले.

हे ही वाचा : Angelo Mathews बॅटिंग न करताच झाला बाद, इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘टाइम आऊट’

सत्य समोर मांडल्यामुळे तुमचा तिळपापड झालाय. तुम्हाल सहन होत नाही. मराठे जर सगळेच कुणबी निघाले,त्यामुळे आपण खातोय ते जातंय की काय, तुम्ही एकस्ट्रा खाताय तेच जातंय, असा पलटवार जरांगेनी भुजबळांवर केला. माणसाने थोडसं भानावर येऊन बोलावं, असा टोला देखील जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना लगावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

छगन भुजबळांनी आज आम्ही ५४ टक्के ओबीसी आहोत, जातनिहाय जनगणना करणार अशी मागणी केली होती. यावर जरांगे पाटील म्हणाले, आता ज्याच्या विहरीत पाणी आहे, त्यांनी असं बोलल्यावर काय म्हणायचं, जनगणना काय आमच्या हातात आहे, करा ना मग, तुम्हाला कुणी अडवलं, असे थेट उत्तरच जरांगेनी सरकारला दिले.

जरांगेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

अंतरावली सराटीत 70 पोलीस जखमी झाले आहेत. हे षडयंत्रच आहे. पोलिसांवर दगडफेक केला, हेच आता जनतेने ओळखले आहे. जनतेने मार खाऊन त्यांच्याविषयी बोलायचं नाही. असे असेल तर लावा उच्चस्तरीय चौकशी. हा आमचा कट कुणी घडवुन आणला, याचीच उच्चस्तरीय चौकशी होऊन जाऊदे.होऊ द्या १५ दिवसा आधीपासूनची चौकशी. दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊदे . कुणी ऑर्डर केल्या पोलिसांना, की पोलिसांनी आम्हाला मनानीच हाणल आहे, हे समोर येऊ द्या, त्यामुळे जरांगे पाटलांची सरकारला जाहीर आवाहन करत चौकशीची मागणी केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ”बेईमानी करणाऱ्यांना घरी बसवलं”,ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर CM शिंदेंची ठाकरेंवर टीका

भुजबळ साहेब चांगलचं काम करतात. जिकडे खरा अन्याय झालाय तिकडे जातच नाही, जिकडे पाहुण्यांचा कार्यक्रम असतो, तिकडे जातात . खरा अन्याय झाल्यावर गेले की लोक पण त्यांना खुप मदत करतील, त्यांच्या पाठिशी उभे राहतील, आता त्यांच्या हातानेत ते रस्ता चुकायला लागलेत असा टोलाही जरांगेनी भुजबळांना लगावला.

ADVERTISEMENT

पत्रकारांनी यावेळी जरांगेना भुजबळांच्या मागे मास्टरमाईंड कोण? असा सवाल केला होता. यावर जरांगे म्हणाले, हे लफडं आपल्याला नाही कळायचं. ते इतके मास्टरमाईंड आहेत की त्यांच्यावर आता कोण मास्टरमाईंड असावा, तो कोणत्या मास्टरला टीकून देतील का, अशी खिल्लीच उडवली. तसेच करेंगे आणि मरेंगे म्हणजे काय तुम्ही हिंसाचार घडवायला निघातेल का, असा सवाल देखील जरांगेनी भुजबळांना केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT