Marine Drive : मुंबईत तरूणीचा विवस्त्र मृतदेह, अजित पवार सरकारवर खवळले

मुंबई तक

ADVERTISEMENT

murder 19 year old lady womens hostel marine drive mumbai ajit pawar criticized shinde fadnavis govt
murder 19 year old lady womens hostel marine drive mumbai ajit pawar criticized shinde fadnavis govt
social share
google news

Latest Marathi News: मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थतेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. (Marine Drive hostel Murder) मुंबई (Mumbai) ही महिलांच्या दृष्टीने खूपच सुरक्षित मानली जाते. मात्र, असं असताना देखील वसतिगृहातच 19 वर्षीय तरुणीची झालेली हत्या ही संपूर्ण प्रशासनासाठी शरमेची बाब आहे. याचबाबत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (murder 19 year old lady womens hostel marine drive mumbai ajit pawar criticized shinde fadnavis govt)

यावेळी अजित पवारांनी या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना संपूर्ण घटनेबाबत नेमकी माहिती सांगितली. तसंच सरकारला देखील याप्रकरणी धारेवर धरलं आहे.

वसतिगृहातील तरुणीच्या हत्येबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

‘मंत्रालयाच्या जवळ असलेल्या जे सावित्रीबाई फुले वसतिगृह आहे महिलांकरिता.. मी पण मुंबईत गेले 30-32 वर्ष राहतोय. अनेक वर्ष त्या वसतिगृहात मुली मग त्या शिकणाऱ्या असतील किंवा नोकरी करणाऱ्या असतील.. ज्यांना राहण्याची जागा नाही, सुरक्षित वाटत नाही अशा प्रकारच्या मुली तिथे राहतात. त्याला एक वेगळ्या प्रकारचा नावलौककी आहे त्या वसतिगृहाला.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘हे वसतिगृह जिथे आहे तो रस्ता हा प्रचंड रहदारीचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, मुंबई कधी झोपत नाही, मुंबई सतत जागी असते. असं बोललं जातं.. अशा ठिकाणी एका निष्पाप विदर्भातील मुलीवर अन्याय केला जातो. मी जी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तिथला जो सुरक्षारक्षक होता. त्या गार्डनेच हे कृत्य केलं. माणुसकीला काळीमा फासणारं असं हे कृत्य आहे.’

हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंच्या होर्डिंगवरून देवेंद्र फडणवीस गायब, ठाण्यात भाजप-सेनेत धुसफूस!

‘पोलिसांनी तपास करायला सुरुवात केल्यावर माहिती अशी मिळाली की, तो परराज्यातील होता. त्यामुळे पोलिसांनी परराज्यात देखील टीम पाठविण्याची तयारी केली होती. पण रेल्वे लाइनवर त्याचा मृतदेह सापडला. पोलीस तपास करत आहेत की, त्याने एकट्याने कृत्य केलंय की, त्याच्या जोडीला आणखी कोणी होतं. कारण चौथ्या मजल्यावर ही मुलगी राहत होती. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बाकीच्या सगळ्या मुली रुममध्ये राहत होत्या. पण ही मुलगी एकाच रुममध्ये राहत होती अशी मला माहिती मिळाली. तिच्या एकटीची रुम ही चौथ्या मजल्यावर होत्या. खालच्या मजल्यावरच्या मुली तिला म्हणाल्या देखील की, तू एकटी वर राहण्यापेक्षा खाली राहायला ये.’

ADVERTISEMENT

‘कदाचित तिला तिथेच सुरक्षित वाटलं असेल. परंतु ज्याने कोणी हे कृत्य केलं त्याला नराधमच म्हटलं पाहिजे. त्या नराधमाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिच्यावर बलात्कार केला आहे का? हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे.’

ADVERTISEMENT

‘खरं तर सरकारला अतिशय शरमेने मान खाली घालणारी ही बाब आहे. अशा घटना सातत्याने वाढत आहेत. सरकार त्याबद्दल कठोर भूमिका का घेत नाही? आपण सगळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अशा घटना घडतात.. राज्याच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात मुली-स्त्रियांना सुरक्षित वाटलं पाहिजे. पण तसं घडत नाही. याला पोलीस, सरकार जबाबदार आहे.’

हे ही वाचा >> Basti Rape Case: 12 वर्षाच्या मुलीवर गँगरेप! भाजप कार्यकर्त्याने घरी बोलावलं आणि नंतर…

‘वास्तविक आरोपीला सुरक्षारक्षक म्हणून कोणी ठेवलं होतं. त्याची माहिती घेतली होती. असंही समजतं आहे की, त्याचे वडील आधी तिथे नोकरीला होते आणि नंतर त्याला तिथे नोकरीला लावलं. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.’

‘काही जणं म्हणतात की, तिथल्या दरवाज्याच्या आतल्या कड्या आहेत.. म्हणजे आतून लावल्या जाणाऱ्या कड्या या फार तकलादू आहेत. असं एका अधिकाऱ्याने मला सांगितलं. जरा दणका मारल्यावर उघडतील अशा आहेत.’

‘अशाप्रकारे मुली-महिलांच्या बाबतीत सरकार निष्काळजी राहणार असेल तर सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. खरं तर सरकारने ही झालेली घटना गृहित धरून राज्यभरातील वसतिगृह हे सुरक्षित आहेत का? हे पाहावं.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले. तसंच सरकारवर देखील टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT