Security Breach in Parliament : 22 वर्षांपूर्वी असाच हादरला होता देश! काय घडलं होतं 13 डिसेंबरला?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

parliament security breach two you your enter lok sabha parliament terror attack 13 december 2001 read full story
parliament security breach two you your enter lok sabha parliament terror attack 13 december 2001 read full story
social share
google news

Security Breach in Parliament : संसदेची सुरक्षाभेदून आज दोन जणांनी लोकसभेत घुसखोरी केल्याची घटना घडली होती. प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या घेत दोन्ही घुसखोरांनी लोकसभेत अश्रुधूर सोडले होते. या घटनेने लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला होता. याच दरम्यान संसदेच्या बाहेर देखील मोठा गोंधळ उडाला. एका महिला आणि पुरूषाने संसद परिसरात घोषणाबाजी करून अश्रुधूरांचा मारा केला होता.विशेष म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर पहिल्यांदाच हल्ल्याची घटना घडली होती. आज या हल्ल्याचा स्मृतिदिन आहे. आणि याच दिवशी पुन्हा सुरक्षेत चुक घडल्याने मोठी घटना घडली आहे. दरम्यान 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेत नेमकं काय घडलेलं? दहशतवाद्यांनी कसा हल्ला केला होता? हे जाणून घेऊयात. (parliament security breach two you your enter lok sabha parliament terror attack 13 december 2001 read full story)

2OO1 साली 13 डिसेंबरला अचानक काही दहशतवाद्यांनी मोठं मोठा शस्त्रसाठा घेऊन कारसह संसदेत घुसखोरी केली होती.त्यावेळेस संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु होते. या दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांना स्थगिती देण्यात आली होती. दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी संसद भवनातून निघाल्या होत्या. तर भाजप नेते लालकृष्ण अडवाणींसोबत इतर 100 जण संसदेत उपस्थित होते.

हे ही वाचा : छमछम! पुणे-साताऱ्यातील डॉक्टरांचे तोकड्या कपड्यातील 4 तरुणींसोबत चाळे, नावे आली समोर

संसद भवनात एक सफेद रंगाची अँम्बेसेडर कार सुरक्षा भेदून घूसली होती. या कारचा नंबर DL-3CJ1527होता. भरधाव वेगाने संसदेत घुसलेल्या या कारने थेट उपराष्ट्रपतींच्या कारलाच धडक दिली होती. या घटनेनंतर उपराष्ट्रपतींच्या ड्रायव्हरने कारमधून उतरून दहशतवाद्यांच्या कार चालकाची कॉलर पकडली होती. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसाने दहशतवाद्यांवर बंदूकीचा नेम धरला होता. यानंतर दहशतवाद्यांनी संसद परिसरात ताबडतोड गोळ्या झाडायला सुरूवात केली होती. काही मिनिटांसाठी संसदेत फक्त गोळ्यांचाच आवाज येत होता आणि मृतदेहाचा सडा पडत होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या हल्यानंतर काही दहशतवाद्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या होत्या, तर काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले होते. हमजा, हैदर उर्फ तुफैल, राना, रनविजय आणि मोहम्मद अशा या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाच दहशतवाद्यांची नावे आहेत.

हे ही वाचा : “शिवाजी महाराज रेडे कापायला सुरतेवरून गुवाहाटीला गेले नव्हते”, राऊत-पटोले संतापले

दरम्यान या तपासात हल्ल्याच्या मास्टरमाईंडचे नावही समोर आले होते. या हल्ल्यामागे मोहम्मद अफझल गुरू, शौकत हुसेन (अफझल गुरूचा चुलत भाऊ) आणि एसएआर गिलानी यांच्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचा हात होता. या दहशतवाद्यांना नंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यामधील अफजल गुरूला 9 फेब्रुवारी 2013 रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

या घटनेत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते, तर 14 लोक मारली गेली होती. सर्वात आधी घटनास्थळी कॉस्टेबल कमलेश कुमारी यादव शहिद झाले होते. तसेच या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे 6 जवान आणि संसद भवनाचे दोन कर्मचारी आणि एक माळी ठार झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT