Hamas Israel : पॉर्न स्टार मिया खलिफाची संघर्षात उडी, हमासबद्दल काय बोलली?
Mia Khalifa Israel palestine : इस्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागे हमास नाही, असे मिया खलिफाने म्हटले आहे. गाझापट्टीतील विध्वंसावरून मिया खलिफाने इस्रायलवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Mia Khalifa Israel-Palestine Conflict : युद्धाचे परिणाम भयानक असतात. याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. पण रानटी दहशतवादी संघटना हमासच्या लढवय्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी इस्रायलवर हल्ला केला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, ज्यात हमासचे दहशतवाद्यांची क्रूरता दिसून येत आहे.
पॅलेस्टाईन आणि हमासवर सर्वत्र टीका होत असताना, उघडपणे हमासला पाठिंबा देणार्या आणि त्यांच्या काळ्या कृत्यांचे समर्थन करणार्यांची कमी नाही. पॉर्न स्टार मिया खलिफा अशाच लोकांपैकी एक आहे.
मिया खलिफा इस्रायल-पॅलेस्टाईनबद्दल काय बोलली?
मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या बाजूने सतत ट्विट करत आहे आणि इस्त्रायल कसा पॅलेस्टाईनमधील लहान मुले, वृद्ध लोक आणि महिलांवर सतत अत्याचार करत आहे आणि त्यांना लक्ष्य करत आहे, याबद्दल बोलत आहे.
हेही वाचा >> इस्रायलला नष्ट करण्याचा डाव, निष्पाप जीवांचा क्रूर छळ… ‘हमास’चा इतिहास काय?
Even Mia Khalifa talk about the brutality of Israel but Malala didnt say a single word about it.
For the first I am sharing Mia Khalifa video. Lots of love and respect to you.#Israel #Gaza #Hamas #طوفان_الأقصى #طوفان_القدس #Hezbollah #Mossad #فلسطين#Palestinian #FreePalestine pic.twitter.com/BS8RBZTQWM— Ali (@Ali7861216216) October 8, 2023