Manoj Jarange : जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट! पुण्यातील प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil has been leading protests demanding OBC certificates for recognizing all Kunbis (agriculturists) and their 'sage soyre' (blood relatives) as Marathas.
Manoj Jarange Patil has been leading protests demanding OBC certificates for recognizing all Kunbis (agriculturists) and their 'sage soyre' (blood relatives) as Marathas.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट का जारी करण्यात आले?

point

पुण्यातील तक्रारदार व्यक्तीचा नेमका आरोप काय?

point

दोन वेळा बजावले होते अटक वॉरंट

Manoj Jarange Patil : (ओमकार वाबळे, पुणे) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता न्यायालयाने जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. (why the Pune court has issued an arrest warrant against Manoj Jarange-Patil)

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांच्या जुन्या प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला असून, पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे. 

मनोज जरांगेंविरोधात कोणी केली तक्रार?

पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचे आयोजन केले होते. त्यासंदर्भात नाट्य निर्मात्याला मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण पैसे दिले गेले नाही. 

हेही वाचा >> 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा गिरीश महाजनांवर संतापले

निर्मात्याने कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची पुणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप आमदार अडचणीत! हायकोर्टाने पोलिसांना झापले, प्रकरण काय? 

नाटकांचे प्रयोग आयोजित केले मात्र पैसेच दिले नाही, असा आरोप असून, मनोज जरांगे पाटील, अर्जून प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात गुन्हा आहे. 

ADVERTISEMENT

न्यायालयाने जरांगे पाटलांना ठोठावला होता ५०० रुपये दंड

पुणे न्यायालयाने मनोज जरांगे यांना दोन वेळा समन्स बजावले होते. पण, आंदोलन सुरू असल्याने ते हजर राहू शकले नव्हते. न्यायालयाने मनोज जरांगे यांच्यासह तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. तिघेही न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने ५०० रुपये दंड ठोठावत अटक वॉरंट रद्द केले होते. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT