Ajit Pawar: 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा संतापले.. मंत्रिमंडळ बैठकीतील Inside Story

ऋत्विक भालेकर

Ajit Pawar Cabinet Meeting: राज्यातील काही ज्येष्ठ मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी केल्यानंतर अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच संताप व्यक्त केला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

ADVERTISEMENT

अजितदादा मंत्र्यांवर संतापले..
अजितदादा मंत्र्यांवर संतापले..
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार संतापले

point

ज्येष्ठ मंत्र्यांनाचा नाकारला अजित पवारांनी निधी

point

वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील Inside Story

Ajit Pawar angry in Cabinet Meeting: मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आज (22 जुलै) अक्षरश: वादळी ठरली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांनाच निधी देण्यास थेट नकार दिला. यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. ज्येष्ठ मंत्र्यांनी जेव्हा अजित पवारांकडे निधीची मागणी केली तेव्हा 'राज्यातील जमिनी विकून पैसे देऊ का?' असा करडा सवाल विचारत अजितदादांनी निधीची मागणी धुडकावून लावली. (should we pay by selling land in the state ajit pawar was angry with the ministers inside story of maharashtra cabinet meeting)

मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादा का चिडले?, वाचा Inside Story

'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?' असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निधीची मागणी करणाऱ्या मंत्र्यांना केला. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

हे ही वाचा>> Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story

आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधीच्या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

राज्याचे ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पण यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी देण्यास नकार देण्यात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp