पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष
पुण्यात पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लाल महाल चौकात 31 गणेश मंडळे सहभागी होणार असून पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष रंगणार आहे. गतवर्षी सुरू केलेल्या डीजेमुक्त दहीहंडीच्या उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळत असून, उत्सवाचा आनंद डीजेशिवायही घेता येतो, असा संदेश पुनीत बालन यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी-मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल महाल चौकात संयुक्त दहीहंडी सोहळा रंगणार आहे. पुनीत बालन ग्रुपने दोन वर्षांपासून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरु केला आहे. तर गतवर्षी डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करून महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक डीजेमुक्त दहीहंडी साजरी केली होती. त्यानंतर डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका ग्रुपने सातत्याने घेतली आहे. या उपक्रमाला यंदा व्यापक प्रतिसाद मिळत असून यावर्षी तब्बल 31 गणेश मंडळे या सयुंक्त दहीहंडीत सहभागी होणार आहेत.
या संयुक्त दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात दुपारी तीन वाजता प्रभात बँडच्या वादनाने होणार आहे. त्यानंतर मानवंदना होणार असून या कार्यक्रमांनंतर रमणबाग तेजस्विनी , पकवाज टाळ, शिवाद्य, गजर, हलगी वादन, मर्दानी खेळ, आवर्तन , समर्थ, शिवमुद्रा आणि अष्टविनायक या पथकांचे सादरीकरण होणार आहे.
‘उत्सवाचा आनंद डीजेशिवायही घेता येतो’
“दहीहंडी आणि गणेशोत्सव हे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहेत. या उत्सवांचा आनंद मोठ्या आवाजाच्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही तितक्याच उत्साहाने घेता येतो. गतवर्षी सुरू केलेल्या डीजेमुक्त दहीहंडीच्या उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोनशेहून अधिक गणेश मंडळांनी डीजे न लावण्याचा घेतलेला निर्णय ही सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब आहे. पुढील काळात पुण्यातील उत्सव अधिक पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे.' अशी प्रतिक्रिया पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली.
सयुंक्त दहीहंडी उत्सवात सहभागी होणारी गणेश मंडळे
- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
- श्रीमंत पेशवे गणेश मंदिर
- श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
- पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती
- श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड)
- उदय तरुण मंडळ ट्रस्ट (एफ.सी. रोड)
- नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट
- मुंजोबा तरुण मंडळ (पी.एम.सी.)
- फणी आळी तालीम ट्रस्ट
- प्रकाश मित्र मंडळ
- भरत मित्र मंडळ
- आझाद हिंद मंडळ (जे.एम. रोड)
- व्यवहार आळी चौक मित्र मंडळ ट्रस्ट
- त्वष्टा कासार समाज संस्था
- श्रीराम अभिमन्यू मंडळ पुणे
- श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान
- जनता जनार्दन मंडळ
- क्रांतिवीर राजगुरु मित्र मंडळ
- गणेश मित्र मंडळ (अलका चौक)
- भोईराज मित्र मंडळ
- शिवतेज ग्रुप
- नटराज ग्रुप
- श्रीकृष्ण मंडळ (ट्रस्ट)
- विश्वज्योत मित्र मंडळ (ट्रस्ट)
- कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्र मंडळ
- शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (झाशीचीराणी चौक)
- जनार्दन पवळे संघ
- शिवशक्ती मंडळ तुळशीबाग
- नेहरु तरुण मंडळ, कसबा पेठ
- त्रिमूर्ती मित्र मंडळ, माणिक चौक, कसबा
