Maharashtra Weather: आज पाऊस कोकण किनारपट्टीला झोडपणार, सातारा-कोल्हापुरात मुसळधार कोसळणार
Maharashtra Weather Update: 5 जुलै 2025 रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस पडेल, परंतु त्याची तीव्रता तुलनेने कमी असेल.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज (5 जुलै 2025) रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वेगवेगळ्या तीव्रतेच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांसह प. महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच देखील
कोकण आणि गोवा
कोकण किनारपट्टी, विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 5 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: भुयारी बोगद्याच्या बांधणीला गती... वन खात्याची "इतकी" जागा पालिकेला मिळणार!
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये 5 जुलै रोजी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात 5 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. दरम्यान, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उष्मा जाणवण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> पुणेकरांसाठी गुड न्यूज.. मेट्रोबाबत मोठी बातमी, लवकरच 'या' स्टेशनवरून करता येणार प्रवास!
विदर्भ
विदर्भात 5 जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे, विशेषतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये. हवामान खात्याने या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याचा इशारा
पूरजन्य परिस्थिती असल्यास नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई आणि कोकण किनारपट्टी लगत असणाऱ्या नागरिकांनी भरतीच्या वेळी समुद्र किनारी जाणं टाळावं.
भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या ट्विटर हँडलवर 4 जुलै 2025 रोजी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मान्सून सक्रिय आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.