Ram Mandir : महाराष्ट्राचा खारीचा वाटा! राम मंदिरासाठी पाठवली ‘ही’ महत्त्वाची गोष्ट!
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी देशातील विविध राज्यातून साहित्य मागवले गेले. यात महाराष्ट्राचाही खारीचा वाटा आहे. कोणत्या राज्यातून कोणते गोष्टी आल्या… तेच जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम वेगाने सुरू आहे. या मंदिराच्या उभारणीत देशभरातील रामभक्तांनी आपापल्या परीने योगदान दिलं. महत्त्वाचं म्हणजे राम मंदिराची उभारणी करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून वस्तू आणि साहित्य मागवले गेले, त्यात महाराष्ट्रातूनही महत्त्वाचं साहित्य पुरवण्यात आलं. हे साहित्य म्हणजे लाकूड!
मकराना मार्बल
राम मंदिर उभारण्यासाठी चांगल्या साहित्याची निवड केली गेली आहे. मंदिर निर्माणासाठी राजस्थानातील नागौरमध्ये सापडणारे मकराना संगमरवरी (मार्बल) दगड वापरले गेले आहे. मकराना मार्बलचा वापर करूनच राम मंदिराच्या गर्भगृहातील सिंहासन तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा >> बाबासाहेबांचा ‘तो’ इशारा! …म्हणून आंबेडकरांनी नाकारलं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण
गर्भगृह आणि खाली मकराना पांढरे शुभ्र मार्बल वापरण्यात आले आहे. मंदिराचे खांब उभारण्यासाठीही मकराना मार्बलचा वापर करण्यात आला आहे.
मूर्तींसाठी कर्नाटकतील दगड
मंदिरात कोरण्यात आलेल्या देवी दैवांच्या मूर्तींसाठी वेगळा दगड वापरला गेला आहे. या मूर्ती कर्नाटकातील चर्मोथी बलुआ दगडावर कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारावरील भव्य मूर्ती राजस्थानातील बन्सी पहाडपूरमधील गुलाबी बलुआ दगडापासून साकारण्यात आल्या आहेत. गुजरातने २१०० किलोंची अष्ठधातूंची घंटा दिली गेली आहे.