'राजाची हत्या नव्हे, नरबळी..', भाऊ सचिन रघुवंशीने सोनमवर केले गंभीर आरोप! खळबळजनक माहिती समोर
Raja And Sonam Honeymoon Case : शिलाँगपासून 50 किलोमीटर दूर चेरापूंजीच्या वेई सोहडोंग (वाईडोंग) परिसरात 23 मे रोजी राज रघुवंशीचा मृतदेह आढळला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

सचिन रघुवंशीचे सोनमवर केले 'हे' आरोप

मांत्रिकाचं नेमकं कनेक्शन काय?
Raja And Sonam Honeymoon Case : शिलाँगपासून 50 किलोमीटर दूर चेरापूंजीच्या वेई सोहडोंग (वाईडोंग) परिसरात 23 मे रोजी राज रघुवंशीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात या हत्या प्रकरणाची एकच चर्चा रंगली होती. राजा-सोनम हनिमून प्रकरणात आता नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी राजाची पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकरासह पाच जणांना अटक केली आहे. तपासात उघडकीस आलंय की, हत्येचा कट खूप चालाखीने आणि प्लॅन करून रचण्यात आला. याचदरम्यान, मृत राजाचा भाऊ सचिन रघुवंशीने सोनमवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर याप्रकरणाने नवं वळण घेतलं आहे.
सचिन रघुवंशीचे सोनमवर केले 'हे' आरोप
सचिन रघुवंशीने राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा दावा केला आहे. त्याच्या भावाचा मृत्यू सामान्य अपघात नव्हता, असं त्याने म्हटलं आहे. तांत्रिक-मांत्रिक पद्धतीने एक नरबळी होता. राजाची पत्नी सोनमने तिच्या वडिलांची तब्येत सुधारण्यासाठी हा नरबळी दिला आहे. माझा भाऊ राजा रघुवंशीची हत्या झाली नाही. त्याचा बळी देण्यात आला आहे.
हे ही वाचा >> कमल भाभीनंतर आता 'या' दोघी... अश्लील व्हिडिओ करतात असं म्हणणारा 'तो' कोण नेमकं प्रकरण काय?
सचिन रघुवंशीने असाही दावा केला आहे की, सोनमच्या वडिलांना यापूर्वी दोनदा हार्ट अटॅक आला होता. आता ते पूर्णपणे ठीक होते. 60 वर्षीय व्यक्तीसाठी माझ्या भावाचा जीव घेण्यात आला आहे. सचिनने असाही आरोप केला आहे की, सोनम आणि तिचे कुटुंबीय मांत्रिकांच्या संपर्कात होते.
सोनमच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
सचिन रघुवंशीने आरोप केल्यानंतर सोनमच्या कुटुंबाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जर हे आरोप खरे ठरले, तर या प्रकरणाला वेगळच वळण लागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Rain Update: पुढील 3 तास धोक्याचे, IMD कडून ठाणे जिल्ह्यासाठी Red अलर्ट जारी.. अतिमुसळधार पाऊस
माहेरीच केलं होतं हत्येचं प्लॅनिंग
सोनमने तिच्या माहेरी राहून राजाला मारण्याचं संपूर्ण प्लॅनिंग केलं होतं. 15 मे रोजी ती तिच्या माहेरी गेली आणि तिथे तिने गुवाहाटीला जाण्यासाठी तिकीट बुक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्याशी फोनवर सतत संपर्कात होती. सोनम आणि राज यांनी मिळून राजाला मेघालयात नेऊन त्याला संपवण्याची योजना आखली होती.