Rain Update: पुढील 3 तास धोक्याचे, IMD कडून ठाणे जिल्ह्यासाठी Red अलर्ट जारी.. अतिमुसळधार पाऊस
Rain Red Alert: कोकण किनारपट्टीत मान्सून पूर्णपणे सक्रीय झाला असून सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह ठाण्यामध्ये जोरदार पाऊस बरसत असून आता हवामान खात्याकडून अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

ठाणे: भारतीय हवामान खात्याने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी आज (16 जून) दुपारी पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मुंबई, रायगड आणि पालघर यांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. कारण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ठाण्यात येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा अंदाज:
IMD ने ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील 3-4 तासांत 200 मिमी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मते, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Low-Pressure Area) आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकण किनारपट्टीसह ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा जोर अधिक वाढू शकतो.
हे ही वाचा>> Mumbai Rain: मागील 2 तासांपासून मुंबईत सुरूय धडकी भरवणारा तुफान पाऊस, पाहा कुठे-कुठे पाणी भरलं?
ठाण्यातील सध्याची परिस्थिती:
पाणी साचणे: ठाण्यातील कळवा, मुंब्रा, डोंबिवली, आणि कल्याण यासारख्या खाडी किनारी असलेल्या शहरांमध्ये पाणी साचण्याच्या भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर 1-2 फूट पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
वाहतूक: ठाण्यातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.