Mumbai Rain: मागील 2 तासांपासून मुंबईत सुरूय धडकी भरवणारा तुफान पाऊस, पाहा कुठे-कुठे पाणी भरलं?

मुंबई तक

मुंबईत मागील काही तासांपासून सतत तुफान पाऊस बरसत आहे. अशावेळी आता अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जाणून घ्या पावसाचे नेमके अपडेट

ADVERTISEMENT

Mumbai Rain
Mumbai Rain
social share
google news

Mumbai Rain: मुंबई: मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही तासांपासून शहरात मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे हाल झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसह कोकण विभागात पुढील 24 ते 48 तासांसाठी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आयएमडीने मुसळधार पावसाच्या अंदाज वर्तवला असून नागरिकांना किनारी आणि सखल भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा जोर लक्षात घेता मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सतर्क आहेत आणि मुंबईकरांना मदत करण्यास सज्ज आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100/112/103 वर कॉल करा.

हे ही वाचा>> पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कोसळलेल्या पूलाचे फोटो आले समोर

हवामान खात्याचा अंदाज:

भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर काही भागांसाठी रेड अलर्टची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या मते, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Low-Pressure Area) आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे मुंबई, ठाणे, पालघर, आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp