पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कोसळलेल्या पूलाचे फोटो आले समोर
Indrayani River Bridge Collapes : ग्रामीण पुण्यातील तळेगाव दाभाडेलगत असणाऱ्या कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आज ( 15 जून ) रोजी घडली आहे. यावेळी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची काही दृश्ये आता समोर आली आहेत.
ADVERTISEMENT

1/5
ग्रामीण पुण्यातील तळेगाव दाभाडेलगत असणाऱ्या कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आज ( 15 जून ) रोजी घडली आहे. यावेळी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

2/5
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी स्थानिक प्रशासनाने मान्सूनची परिस्थिती पाहून हा पूल बंद ठेवला होता. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांनी कुंडमळा हे स्पॉट गाठत आनंद घेतला. मात्र, नदीवरील पूल कोसळल्याने तब्बल 32 जण वाहून गेल्याची माहिती वृत्तमाध्यमांनी दिली आहे.

3/5
दरम्यान, इंद्रायणी नदीचा पूल हा जूना आहे. या पूलावर अनेक पर्यटक उपस्थित होते. पूलाला पर्यटकांचा भार न पेलल्याने पूल कोसळला असल्याचा अंदाज आहे. दरम्यान वाहून गेलेल्या पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता अशी माहिती समोर आली.

4/5
अशातच घटनास्थळी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यांचे फोटो समोर आले आहेत.

5/5
दरम्यान, पुणे शहरापासून 30 किमी अंतरावर असणारं निसर्गरम्य आणि विकली स्पॉट म्हणून पुणेकरांसाठी कुंडमळा या वीकली स्पॉटचं नाव समोर येतं. या ठिकाणी नदी, धबधबे, झरे, तलावाला भेट देण्यासाठी लोक येत असतात. इथेच नदीच्या काठावर एक कुंद्राई देवीचं मंदिर आहे. याच ठिकाणी वाहत्या पाण्याचे झरे, असे निसर्गरम्य वातावरण आहे.