सांगलीत 69 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून, अल्पवयीन तिघांचा समावेश
Sangli Crime : सांगली शहरातून एक मन सून्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील वसंतदादा साखरकारखान्याच्या पाठीमागील बैलगाडी तळावर किरकोळ वादातून एका वृद्धाची दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण परिसरा हादरून गेला असून भीतीचे वातावरण पसरलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गाडीतळवरून जाताना तीन मुलांसोबत वृद्धाचा वाद
डोक्यात दगड घालून ठेचून ठार मारलं
Sangli Crime : स्वाती चिखलीकर - सांगली शहरातून एक मन सून्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील वसंतदादा साखरकारखान्याच्या पाठीमागील बैलगाडी तळावर किरकोळ वादातून एका वृद्धाची दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आली. राजेंद्र घायतिडीक (वय 69) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयतींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरा हादरून गेला असून भीतीचे वातावरण पसरलं आहे.
हे ही वाचा : बुलढाणा हादरलं! पोटच्या लेकानं बापाचा केला खून, मृतदेह शेतात जाळला..
गाडीतळवरून जाताना तीन मुलांसोबत वृद्धाचा वाद
राजेंद्र घायतिडक मूळचे अहिल्यानगर येथील प्रकाशनगर परिसरातील रहिवासी होते. कौटुंबिक कारणातून ते काही काळापासून पलूस येथे आपल्या मुलीकडे राहत होते. सायंकाळी ते संजयनगरमधल दुसऱ्या मुलीकडे आले होते. सोमवारी रात्री साडेआकरा वाजता कारखान्याच्या पाठीमागील दिशेने गाडीतळवरून जाताना तिथे तीन अल्पवयीन मुले आली होती. तेव्हा राजेंद्र यांनी त्या तीन अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला होता.
अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून ठेचून ठार मारलं
प्रत्युत्तरात संबंधित अल्पवयीन मुलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्या तिघांनीही राजेंद्र यांना ढकलून दिले. इतक्यात राजेंद्र यांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र घायतिडक यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. मध्यरात्री घडलेली ही घटना सकाळी उघडकीस आली होती. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी संजयनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली होती.
हे ही वाचा : पैसे देण्यास नकार, डोक्यात तिडीक उसळताच MBBS विद्यार्थ्याची हत्या
या प्रकरणात पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपअधीक्षक संदीप भागवत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस संजीव झाडे यांनी या प्रकरणाचा तपास करत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, याच परिसरात रात्रीच्या वेळी खुल्या मैदानावर सायंकाळी मद्यधुंद तसेच व्यसनी तरूण धिंगाणा घालताना दिसत आहेत. या ठिकाणी सराईत गुन्हेगारांचा देखील वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.









