मारहाण प्रकरणात खासदार राजन विचारेंवर आरोप, मीनाक्षी शिंदे काय म्हणाल्या?
शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी असा आरोप केला की, एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी राजन विचारे प्रयत्न करत आहे.
ADVERTISEMENT
ठाण्यात ठाकरे गटातील एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारदार रोशनी शिंदे यांनी केला आहे. मात्र, हे आरोप शिवसेनेकडून फेटाळण्यात आले आहेत. शिवसेनेच्या मीक्षानी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी खासदार विचारेंचं नाव घेत गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT
ठाण्यात शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “काल जो प्रकार झाला आणि त्यासंदर्भात आम्हाला माहिती मिळाली. जोप्रकार झालेला आहे, त्यासंदर्भात वेगळाच बाऊ उठवला गेला. त्या मुलीला समजावण्यासाठी आमच्या मुली गेल्या होत्या. तिथे कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही. त्यासंदर्भात त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.”
“एमएलसी रिपोर्ट आल्यानंतर त्या गोष्टीची माहिती मिळेल. डॉक्टर त्याबद्दल रिपोर्टमध्ये खुलासा करतील. या गोष्टी माध्यमांसाठी करून प्रसारित करत आहे. मुख्यमंत्र्यांचं ठाण्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना बदमान करण्यासाठी त्यांच्या पक्षातील महिलेवर असा आरोप केला जात आहे”, असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
राजन विचारेंवर नाव न घेता टीका
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, “एका महिलेला पुढे करून तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे खासदार ज्याप्रकारे राजकारण करत आहेत, ते फारच चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. एका मुलीला पुढे करून अशा प्रकारे ते आरोप करत आहे. मुलीला मारहाण केल्याचा आरोप करत आहेत, पण फुटेज तपासलं तर त्या फुटेजमध्ये कुठेही मारताना दिसत नाही. फक्त बोलताना आणि बाचाबाची होताना दिसते”, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
हेही वाचा – ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाकडून मारहाण; वादाचं कारण आलं समोर
ठाण्यातील या प्रकरणावर मीनाक्षी शिंदे असंही म्हणाल्या की, “एमएलसी रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या उघड का केल्या जात नाही. तिची बदनामी ते स्वतःहून करत आहेत. तिला मारहाण केली. पोटावर लाथा मारल्या. रिपोर्टमध्ये सगळं दिसेल. तिच्या दोन दिवसांच्या फेसबुक पोस्ट बघितल्या, तर त्यामध्ये ती रस्त्यावर पडून नाचत आहे. ती प्रेग्नंट आहे, हे दिसत नाही. एमएलसी रिपोर्टमध्ये हे नक्कीच कळेल”, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंवर मीनाक्षी शिंदे यांची टीका
“यामध्ये उद्धव ठाकरेंनाही आणलं जात आहे. खरंतर हे महारष्ट्राचे दुर्भाग्य म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा कारभार घेतला आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जेव्हा ग्रामीण बागातील लोक तिथे आले होते. त्यात एकजण ह्रदयविकाराचा झटका येऊन मेला. मात्र, उद्धव ठाकरेंनी तेव्हा ही संवेदना दाखवली नाही आणि आज तिला मोठं करण्यासाठी हे सोगं केलं जात आहे”, असा आरोप त्यांनी केला.
ADVERTISEMENT
“उद्धव ठाकरे यासाठी ठाण्यात येत आहे, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. सिव्हिल सर्जननी तिला लगेच डिस्चार्ज दिला, पण खासगी रुग्णालयात नेऊन तिला सलाईन लावून झोपवलं आहे आणि तिला बघण्यासाठी ते (उद्धव ठाकरे) येताहेत”, असं म्हणत मीनाक्षी राऊत यांनी टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT