'मी एवढी सुंदर, आणि तू तर...', ज्या पतीने सगळं सुख दिलं त्यालाच पत्नीने दाखवला ठेंगा!

मुंबई तक

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका पतीने एसपी कार्यालयात पत्नीविरोधात एक वेगळीच तक्रार दाखल केल्याचं समोर आलं आहे. पती म्हणाला, "ती माझ्यापेक्षा जास्त सुंदर असल्यामुळे तिला माझ्यासोबत राहायचं नाही. त्यामुळे ती सासरी परत येणार नसल्याची ती धमकी देते."

ADVERTISEMENT

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या दोन वर्षांनंतर पत्नीच्या मनात वेगळाच विचार

point

पत्नी जास्त सुंदर असल्यामुळे सतत धमकी

छतरपूर (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील छतरपुरमध्ये एका पतीने एसपी कार्यालयात पत्नीविरोधात एक वेगळीच तक्रार दाखल केल्याचं समोर आलं आहे. तक्रार केलेल्या अर्जात पतीने आपल्या पत्नीवर बरेच गंभीर आरोप केले आहेत. पतीच्या मते, त्याची पत्नी त्याला सतत धमकावते. पती म्हणाला, "ती माझ्यापेक्षा जास्त सुंदर असल्यामुळे तिला माझ्यासोबत राहायचं नाही. त्यामुळे ती सासरी परत येणार नसल्याची ती धमकी देते." तसेच, तिच्यावर जबरदस्ती केल्यास ती जीव सुद्धा घेऊ शकत असल्याचं पतीने सांगितलं. जाणून घ्या, नेमकं प्रकरण...

पत्नीवर केले गंभीर आरोप 

ओरछा रोड पोलीस स्टेशन परिसरातील भगवंतपुरा गावातील हे प्रकरण आहे. येथील रहिवासी विनोद अहिरवार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक वेगळाच तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांची पत्नी गोमती अहिरवार हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनोद यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी त्यांच्या पत्नीला अगदी मेहनतीने शिक्षण दिलं मात्र ती आता सासरच्या मंडळींना सोडून तिच्या माहेरी निघून गेली. तिला सासरी जाण्याची इच्छा नसून ती तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देखील देत असल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा: शारीरिक संबंधं करताना पतीने पत्नीला खूश केलं नाही..चिडलेल्या पत्नीने पतीला चाकूने भोसकलं अन्..

स्वत:च्या मेहनतीने पत्नीला शिकवलं 

विनोद अहिरवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की जून 2023 मध्ये त्यांचं गोमती अहिरवारशी लग्न झालं. त्यावेळी गोमतीने फक्त 12 वी पर्यंत शिकलेली होती. आर्थिकदृष्ट्या तितका खंबीर नसून सुद्धा त्यांनी गोमतीला पुढे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. पत्नीला शिक्षण देण्यासाठी पै-पै जमा केला आणि गोमतीला उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. 

"स्वत:ला जास्त सुंदर समजते"

विनोद यांच्या मते, गोमतीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. गोमतीला पतीसोबत राहायची इच्छा नसून ती विनोदपासून सतत लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. गोमती स्वत:ला जास्त सुंदर समजत असल्याचं विनोद यांनी सांगितलं. याच कारणामुळे तिला विनोदसोबत राहण्याची इच्छा नसून ती परत सासरी येणार नसल्याचं विनोद यांनी स्पष्टपणे सांगितलं.

हे ही वाचा:  मुंबईची खबर: तीन बायका अन् फजिती ऐका! भामट्याने रेल्वेत काम करणाऱ्या महिलेलाही फसवलं, मेट्रोमोनी साईटवर..

जीवे मारण्याची धमकी

तसेच आपली पत्नी सतत आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं देखील विनोद यांनी म्हटलं. पूर्णपणे विचलित आणि अस्वस्थ असलेल्या विनोद अहिरवार यांनी आता पोलिस अधीक्षकांकडे न्यायासाठी अपील केलं आहे. विनोदने एसपींना या प्रकरणात लक्ष घालण्यासोबत त्यांच्या पत्नीकडून होणाऱ्या छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांपासून त्यांची सुटका करण्याची विनंती केली आहे.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp