लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी वडील लावायचे ‘टेस्टेस्टोरॉन जेल’! पण 10 महिन्यांच्या मुलीच्या संपर्कात येताच पुरुषांप्रमाणे...
स्वीडनच्या गॉथेनबर्गमध्ये एका महिन्यांच्या मुलीच्या शरीरात टेस्टेस्टोरॉन क्रीममुळे असामान्य बदल पाहायला मिळाले. मुलीच्या गुप्तांगामध्ये पुरुषांसारखी लक्षणं आढळून आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शक्ती वाढवण्यासाठी वडील लावायचे ‘टेस्टेस्टोरॉन जेल’
10 महिन्यांच्या मुलीच्या शरीरात असामान्य बदल
मुलीच्या गुप्तांगात पुरुषांसारखी लक्षणं
स्वीडनच्या गॉथेनबर्गमध्ये एका धक्कादायक आणि विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका महिन्यांच्या मुलीच्या शरीरात टेस्टेस्टोरॉन क्रीममुळे असामान्य बदल पाहायला मिळाले. मुलीच्या गुप्तांगामध्ये पुरुषांसारखी लक्षणं आढळून आली. वैद्यकीय तज्ज्ञांनी, हा बदल ‘मायक्रोपेनिस’ असल्याचं सांगितलं. वडिलांच्या टेस्टोस्टेरॉन जेलच्या संपर्कात आल्यामुळे मुलीच्या शरीरात हा बदल झाल्याचं समोर आलं.
नेमकं काय घडलं?
साहलग्रेन्सका युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील बालरोग एंड्रोकाइनोलॉजी तज्ज्ञ प्रोफेसर जोवाना डाहलग्रेन यांनी मुलीच्या शरीरातील असामान्य बदलामागचं कारण उघडकीस आणलं. ती 10 महिन्यांची मुलगी नेहमी आपल्या वडिलांच्या छातीवर झोपायची आणि तिथे तिचे वडील नेहमी टेस्टोस्टेरॉन जेल लावायचे.










