Maharashtra Weather: कोकणासह 'या' भागात जोराचा पाऊस कोसळणार, मध्य महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह पावसाची बॅटींग
Maharashtra Weather Today: हवमान विभागाने राज्यातील हवामानाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. कोणत्या भागात मान्सून नेमका कसा असेल, याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोकणासह 'या' भागात मान्सूनस्थिती

हवामान विभागाच्या अंदाजाची अपडेट
Maharashtra Weather : हवामान विभागाच्या (IMD) नुसार राज्यातील कोकण भागात मान्सूनची स्थिती चांगली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवमान विभागाने मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. याच भागातील हवामान विभागाच्या एकूण अंदाजाबाबत माहिती पुढीलप्रमाणे नमूद केली.
हेही वाचा : कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला नेलं घरी, नंतर केलं लैंगिक शोषण, जर कोणाला सांगितलं तर....दिली धमकी
कोकणतील मान्सून स्थिती
राज्यातील हवामान विभागाने हवामानाबाबत सविस्तर अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील हवामान विभागाने कोकण किनारपट्टी, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणातील काही भागांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
कोकणातील नागरिकांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच घराबाहेर पडावं. समुद्रकिनारी जाणं टाळावे, कारण त्या ठिकाणी मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील 'या' भागात विजांचा गडगडाट
मध्य महाराष्ट्राचा विचार केल्यास पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे 40-120 मिमी पावसाचा अंदाज असणार आहे. तसेच तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मान्सून दाखल होणार आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये मान्सूनचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्यात पावसाचा जोरा कायम असणार आहे. तसेच घाट परिसरात भूस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणावर गोळीबार, तपासादरम्यान दारूच्या बाटल्या कंडोम अन्...'त्या' रात्री घडलं काय?
मराठावाडा आणि विदर्भातील मान्सूनस्थिती
मराठवाडा आणि विदर्भातील दोन्ही भागांमधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर आणि चंद्रपूरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होणार आहे. काही ठिकाणी 30-50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी असा हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.