दिराने वहिनीला लावलं 'सिंदूर' आणि दोघांनी मारली धबधब्यात उडी, सोशल मीडियावर टाकला VIDEO
मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यात एकमेकांसोबत प्रेमसंबंधात असलेल्या दिर आणि वहिनीने कुटुंबियांना कंटाळून एकत्र आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. दोघांनाही एकाच वेळी बहुती धबधब्यात उडी मारून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेमसंबंधात असलेल्या दिर आणि वहिनीने एकत्र संपवलं आयुष्य

सिंदूर लावलं आणि वहिनीसोबत धबधब्यात उडी...
Crime News: मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. एकमेकांसोबत प्रेमसंबंधात असलेल्या दिर आणि वहिनीने कुटुंबीयांना कंटाळून एकत्र आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. दोघांनाही एकाच वेळी बहुती या धबधब्यात उडी मारून आत्महत्या केली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनाही एका वेगळंच कृत्य केलं, दिराने आपल्या वहिनीच्या भांगेत आधी सिंदूर भरलं आणि मग एकत्र धबधब्यात उडी घेऊन आयुष्य संपवलं.
नेमकं काय घडलं?
घटनेत मृत पावलेल्या दिराचं नाव दिनेश साहू (26) तर वहिनीचं नाव सकुन्तला साहू (35) असल्याचं सांगितलं जात आहे. पीडित दिराने आत्महत्या करताना व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओमध्ये दोघांनीही बहुती धबधब्यात उडी मारून आयुष्य संपवल्याचं दिसत आहे. दिनेश साहूने या घटनेचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कुटुंबातील सदस्यांना मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं.
सरकारकडे केली विनंती
दिनेश साहूने व्हिडीओ शेअर करताना कुटुंबातील सदस्यांना वैतागून जीवन संपवत असल्याचं लिहिलं. आमच्या दोघांच्या मृत्यूला हीरालाल साहू, राजेंद्र साहू, संतोष साहू, राजकुमार साहू आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जबाबदार असल्याचं सांगितलं. तसेच, कुटुंबातील या व्यक्तींना अगदी कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे. यानंतर दिनेशने आपल्या गावाचं नाव देखील सांगितलं आणि वहिनीला सोबत घेऊन एकत्र धबधब्यात उडी मारली.
हे ही वाचा: शक्ती वाढवण्यासाठी वडील लावायचे ‘टेस्टेस्टोरॉन जेल’! पण 10 महिन्यांच्या मुलीच्या संपर्कात येताच पुरुषांप्रमाणे...
तीन मुलांच्या आईसोबत दिराचे संबंध
दिरासोबत प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे त्याच्यासोबत आपलं आयुष्य संपवणारी महिला ही तीन मुलांची आई असल्याची देखील माहिती समोर आली. महिलेला 11 वर्षे, 8 वर्षे आणि 2 वर्षे वय असलेल्या तीन मुली आहेत. या घटनेनंतर त्वरील जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफच्या टीमला बोलवण्यात आलं. मात्र, 600 फूट हून अधिक उंचीवरून खाली पडल्याने आणि पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे मृतदेहाचा शोध घेणं मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: अंघोळ करताना काढले व्हिडीओ अन् ब्लॅकमेल! पुण्यातील क्लास वन अधिकाऱ्याने पत्नीसोबतच असं का केलं?
खरंतर, यापूर्वी देखील बहुती वॉटरफॉल आत्महत्या तसेच अपघाताच्या घटनांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तरीदेखील तेव्हापासून आजपर्यंत यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतंच ठोस पाऊल उचललं गेलं नाही.