कल्याण: 'आधी तिने माझ्या सुनेच्या कानाखाली मारली, नंतर..', मराठी तरूणीच्या मारहाणीचा नवा VIDEO आला समोर!

मिथिलेश गुप्ता

कल्याणमधील एका क्लिनिकमध्ये मराठी तरूणीला मारहाण केल्याचा व्हिडिओसमोर आल्यानंतर आरोपी गोकूळ झा याला अटक करण्यात आली आहे. पण आता याच प्रकरणाचा नवा व्हिडिओ हा समोर आला आहे.

ADVERTISEMENT

मराठी तरूणीच्या मारहाणीचा नवा VIDEO (Video grab)
मराठी तरूणीच्या मारहाणीचा नवा VIDEO (Video grab)
social share
google news

कल्याण: कल्याण पूर्वमधील एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या. ज्यानंतर आरोपी गोकूळ झा आणि त्याचा भाऊ मोठा भाऊ रंजीत झा यांना पोलिसांनी अटक केली. पण आता या प्रकरणातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. 

रिसेप्शनिस्ट तरूणीने गोकूळ झा हिच्या वहिनीला मारलेली कानशिलात, तो VIDEO आला समोर..

सुरूवातीला गोकूळ झा आणि त्याचा मोठा भाऊ हे थेट डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी रिसेप्शनवर असलेल्या तरुणीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोकूळ झा याने तरूणीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आणि तिच्या अंगावर धावून गेला. तसंच त्याने रिसेप्शन टेबलवर देखील लाथ मारली.

यावेळी गोकूळ झा याच्या आईने त्याला ढकलत बाहेर नेलं. पण पुन्हा एकदा गोकूळ झा याने क्लिनिकच्या बाहेरून शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यावेळी रिसेप्शनिस्ट देखील संतापली आणि तिनेही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा>> प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण... पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार

हा सगळा प्रकार घडला तेव्हा तिथेच गोकूळ झा याची वहिनी देखील उभी होती. जेव्हा गोकूळ झा हा जोरजोरात शिवीगाळ करत होता त्यावेळी संतापलेल्या तरूणीने आपल्या टेबलवर असलेली कागदपत्रं प्रचंड रागाने फेकून दिली आणि ती पुढे आली. ज्यानंतर तिने थेट गोकूळ झा हिच्या वहिनीच्या जवळ जाऊन थेट कानशिलात लगावली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp