दिरानेच वहिनीला नेलं पळवून! आधी चाकूने धमकी अन् नंतर... मग पतीने काय केलं?
मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये दिराने चाकूचा धाक दाखवून तीन मुलांची आई असलेल्या वहिनीचं अपहरण केलं आणि नंतर तिला धमकावून, घाबरवून तिला आपल्यासोबत पळवून नेल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चाकू दाखवून आणि धमकावून वहिनीला नेलं पळवून

दिराने वहिनीचं आधी अपहरण केलं आणि नंतर पळवून नेलं
Crime News: मध्य प्रदेशातील शिवपुरीमधून एका धक्कादायक घटना घडली आहे. येथे दिराने चाकूचा धाक दाखवून तीन मुलांची आई असलेल्या वहिनीचं अपहरण केलं आणि नंतर तिला धमकावून, घाबरवून तिला आपल्यासोबत पळवून नेल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रकरणातील आरोपी हा महिलेच्या पतीच्या मामाचा मुलगा म्हणजेच मामेभाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. पतीने पोलीस स्टेशनमध्ये पोहचून आपल्या भावाच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यावेळी रडत रडत पतीने घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली.
चाकू दाखवून वहिनीचं अपहरण...
शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. संबंधित आरोपीला (महिलेचा दिर) दोन मुलं असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने आधी आपल्या पत्नीला दोन्ही मुलांसोबततिच्या माहेरी पाठवले. नंतर त्याने चाकूचा धाक दाखवून आपल्या भावाच्या पत्नीचं म्हणजेच वहिनीचं अपहरण केलं. या सगळ्या प्रकारानंतर आरोपी आपल्या वहिनीला घेऊन पळून गेला. पत्नीचं अपहरण झाल्यानंतर पतीला मोठा धक्का बसला आणि त्याने लगेच तीन मुलांना घेऊन पोलिसात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, एनवारा येथील एक सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीचं तिच्या चुलत दिराने अपहरण केलं. आठवडा उलटूनही संबंधित महिलेबद्दल कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. महिलेच्या पतीने पोलिसांकडे आपल्या पत्नीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी रात्री 9 वाजता पती नेहमीप्रमाणे पहारा गेला होता. त्यावेळी त्याचा मामेभाऊ त्याच्या घरी आला आणि त्याने आपल्या वहिनीला चाकूचा धाक दाखवून तिथून पळवून घेऊन गेला.
हे ही वाचा: पतीचे वहिनीसोबतच अनैतिक संबंध! पत्नीने केला विरोध अन् त्याच रात्री दोरीने गळा दाबून पतीने...
दागिने आणि पैसे देखील नेले
तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे, आरोपीने घरातून त्याच्या पत्नीसोबत चांदीचा कंबरपट्टा, पैंजण, चेन, पेट्रोल पंप सिल्कमधून 27,000 रुपये आणि कामातून मिळालेले 30,000 रुपये हिसकावून घेऊन गेला. तसेच, आरोपीने त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि तिला तिच्या माहेरी घेऊन गेला. असंच, एके दिवशी तो महिलेच्या पतीकडे गेला आणि वहिनीला आपली पत्नी म्हणून ठेवणार असल्याचं त्याने तक्रादाराला सांगितलं. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला.
हे ही वाचा: गुरूने आपल्या शिष्यालाही सोडलं नाही, किडनॅप करून लॉजवर नेलं, मुख्य आरोपीसह...हादरवून टाकणारं प्रकरण
सध्या आरोपी आणि महिला नेमकं कुठे आहेत? याबद्दल काहीच माहिती हाती लागली नाही. तक्रादाराच्या मते, आरोपी महिलेची हत्या सुद्धा करू शकतो. त्यामुळे आपल्या पत्नीचा लवकर शोध घेण्याची मागणी महिलेच्या पतीने पोलिसांकडे केली.