Subrata Roy Dies : सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री 10.30 वाजता कार्डिओ अरेस्टमुळे निधन झाले. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांनी ग्रासले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती.
ADVERTISEMENT
Subrata Roy Passed Away : सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले आहे. ते 75 वर्षाचे होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुब्रत रॉय यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांनी ग्रासले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती. या दरम्यान सुब्रत रॉय (Subrata Roy Passed Away) यांना मंगळवारी रात्री 10.30 वाजता कार्डिओ अरेस्टला आणि त्यांचे निधन झाले.सहारा समूहाने एक निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. (subrata roy passed away at the age 75 year sahara india pariwar founder businessman)
ADVERTISEMENT
सहारा समुहाचे निवेदन
सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री 10.30 वाजता कार्डिओ अरेस्टमुळे निधन झाले. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांनी ग्रासले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती, त्यामुळे त्यांना १२ नोव्हेंबर रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे सहारा समुहाने निवेदन जारी करून म्हटले आहे.
हे वाचलं का?
सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया जिल्ह्यात झाला. ते व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव होते. वित्त, रिअल इस्टेट, मीडिया आणि आदरातिथ्य अशा इतर क्षेत्रांमध्ये एक विशाल साम्राज्य स्थापन केले. सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये सहारा इंडिया परिवार समूहाची स्थापना केली.
हे ही वाचा : रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान
सहारा, म्हणजे हिंदीत मदत, रिक्षाचालक, कपडे धुणारे आणि टायर दुरुस्त करणार्यांकडून दररोज 20 रुपयांची अल्प रक्कम गोळा करते. सहारा भारतीय हॉकी संघालाही प्रायोजित करते आणि फोर्स इंडिया या फॉर्म्युला वन रेसिंग संघात त्यांचा हिस्सा आहे.
ADVERTISEMENT
गोरखपूरपासून प्रवास सूरू
सुब्रत रॉय यांचा प्रवास गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अभ्यासाने सुरू झाला. 1976 मध्ये, संघर्ष करत असलेली चिट फंड कंपनी सहारा फायनान्स ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी गोरखपूरमध्ये व्यवसायात पाऊल टाकले. 1978 पर्यंत, त्यांनी त्याचे रूपांतर सहारा इंडिया परिवारात केले, जे पुढे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक ग्रुप्सपैकी एक बनले.
ADVERTISEMENT
सहारा समुहाने अनेक व्यवसायांमध्ये विस्तार केला. 1992 मध्ये राष्ट्रीय सहारा हे हिंदी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. 1990 मध्ये पुण्याजवळील महत्त्वाकांक्षी अॅम्बी व्हॅली सिटी प्रकल्प सुरू केला. यानतर सहारा टीव्हीसह दूरदर्शन क्षेत्रात प्रवेश केला, ज्याचे नंतर सहारा वन असे नामकरण झाले. 2000 साली सहाराने लंडनचे ग्रोसवेनर हाऊस हॉटेल आणि न्यूयॉर्क सिटीचे प्लाझा हॉटेल यासारख्या प्रतिष्ठित मालमत्तांचे संपादन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं अस्तित्व निर्माण केले.
हे ही वाचा : अचानक बँक खात्यात जमा होऊ लागले पैसे, 2 दिवसात जमा झाले इतके कोटी…
सुब्रतो रॉय यांना तुरूंगवास
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोबतच्या वादात कायदेशीर लढाईनंतर गुंतवणूकदारांविरूद्ध कथित फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहारा प्रमुखांना त्याच्या कंपनीच्या दोन संचालकांसह तुरूंगात टाकण्यात आले. 4 मार्च 2014 रोजी त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. रॉय हे पॅरोलवर तुरूंगातून बाहेर आले होते. सुब्रत रॉय यांना व्याजासह गुतंवणूकदारांना 20 हजार कोटी परत करण्यास सांगितले होते.
सुब्रतो रॉय यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. ज्यात पूर्व लंडन विद्यापीठाकडून व्यवसाय नेतृत्वाची मानद डॉक्टरेट आणि लंडनमधील पॉवरब्रँड्स हॉल ऑफ फेम अवॉर्ड्समध्ये बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार यांचा समावेश आहे. इंडिया टुडेच्या भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीतही त्यांचा नियमितपणे समावेश होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT