अचानक बँक खात्यात जमा होऊ लागले पैसे, 2 दिवसात जमा झाले इतके कोटी…

ADVERTISEMENT

Aligarh Uttar Pradesh 4 crore was deposited in the bank account of a person
Aligarh Uttar Pradesh 4 crore was deposited in the bank account of a person
social share
google news

Bank News : उत्तर प्रदेशातील अलिगढमधील (Uttar Pradesh Aligarh) एक व्यक्ती अचानक करोडपती झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या दोन बँकांच्या खात्यांमध्ये 4 कोटींहून (4 crores) अधिक रक्कम जमा झाली आहे. बँक खात्यात अचानक एवढी मोठी रक्कम जमा झाल्यामुळे त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर त्यांनी ही माहिती संबंधित बँकेचे व्यवस्थापक आणि स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर मात्र पोलिसही चक्रावले होते. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. अलिगढमधील ती व्यक्ती अचानक करोडपती झाल्यामुळे सध्या हा विषय परिसरात चर्चेचा ठरला आहे.

दोनच दिवसात करोडपती

हे प्रकरण अलिगढमधील अप्पर नगर कोतवाली भागातील भुजपुरामध्ये घडले आहे. त्या गावातील अस्लम नावाचा तरुण दिवाळीच्या मुहूर्तावरच दोनच दिवसात अचानक करोडपती झाला आहे. याबाबत अस्लमने सांगितले की, आयडीएफसी बँक आणि यूको बँकेच्या दोन खात्यांमध्ये अचानक 4 कोटी 78 लाख रुपये जमा झाले. त्यामुळे एवढी मोठी रक्कम पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हे ही वाचा >> रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान

चार कोटी पेक्षाही जास्त रक्कम

बँक खात्यावर चार कोटी पेक्षाही जास्त रक्कम जमा झाल्याचे कळताच त्यांनी या प्रकरणी सर्वात अगोदर संबंधित बँक व्यवस्थापक आणि पोलिसांकडे तक्रार केली. अस्लम यांनी सांगितले की, 11 आणि 12 नोव्हेंबरपासून त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. मात्र हे पैसे खात्यावर जमा होत असले तरी आयडीएफसी बँकेच्या खात्यावर पैसे जमा होत होते तर यूको बँकेत ते ट्रान्सफर केलेही जात होते. त्यानंतर बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर बँक खात्याचे तपशील तपासण्यात आले. त्यावेळी त्याआधी छोटी मोठी रक्कम ट्रान्सफर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रकरण गेलं पोलिसात

याबाबत एरिया ऑफिसर अभय कुमार पांडे यांनी सांगितले की, नगर कोतवाली भागातील भुजपुरा चौकी भागात राहणारा असलम यांनी तक्रार दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर सायबर टीमकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. हे प्रकरण तांत्रिक बिघाडाचे असल्याचे दिसत असले तरी तपासानंतरच काय ते सत्य बाहेर येईल असंही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> NCP: ..म्हणून रोहित पवार बारामतीत नव्हते, ‘या’ आमदाराला दिलेला शब्द!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT