Udayanraje bhosale : ‘देवेंद्रजी काळजी करू नका… तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात’

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

udayanraje bhosale old speech goes viral. in this speech udayanraje had praised of devendra fadnavis.
udayanraje bhosale old speech goes viral. in this speech udayanraje had praised of devendra fadnavis.
social share
google news

Udayanraje Bhosale On Devendra Fadnavis : ‘मी उदयन फडणवीस आहे, तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात’, हे शब्द आहेत उदयनराजे भोसले यांचे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ जुलै महिन्यातील आहे, मात्र मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर तो चर्चेत आलाय. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल कसा झाला आणि उदयनराजे भोसले यांनी काय म्हटलंय, ते जाणून घेऊयात…

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत. हे उपोषण सुरू असतानाच लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विरोधकांकडून बोट दाखवलं जात आहे. यातच उदयनराजे भोसले यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

उदयनराजे भोसले कधी आणि कुठे बोलले?

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचा व्हिडिओ मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ हा 15 जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमातील आहे. सातारा जिल्ह्यात भाजपची टिफिन बैठक झाली होती. त्यात उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उदयनराजे काय म्हणाले होते?

‘जो समाजासाठी 24 तास काम करतो, याचं ज्वलंत उदाहरण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत. मी देवेंद्रजींना सांगितलं की, तुमचं सगळं चांगलं आहे. फक्त एक चुकतं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी दुजाभाव केला नाही. सर्वधर्म समभावाची शिकवण त्यांनी दिली. त्याचा विसर काँग्रेसच्या लोकांना पडला. जातीचे राजकारण सुरू केले. त्यात तुमचं एकच आहे की, देवेंद्र भोसले. देवेंद्र पाटील, असं असतं तर… तेवढा एकच सेटबॅक. तो सेटबॅक नाही. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) सर्वगुण संपन्न आहात’, असं उदयनराजे या कार्यक्रमात बोलले.

हे वाचा >> Teachers day viral video : विद्यार्थ्याने असं काय केलं शिक्षकाने धो धो धुतलं?

यातील त्यांचं “काळजी करू नका! मी उदयन फडणवीस आहे, तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात.. देवेंद्रजी, तुमचं सगळं चांगलं चाललं आहे. तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात! पण तुम्ही देवेंद्र शिंदे, महाडिक, जाधव नाही, हीच चूक आहे”, या विधानाची चर्चा जास्त होतेय.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांचं उदयनराजे भोसलेंकडून कौतुक, व्हिडीओ चर्चेत कसा आला?

हा व्हिडीओ शेअर केला तो भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे. त्या म्हणतात, “काळजी करू नका! मी उदयन फडणवीस आहे, तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात.. देवेंद्रजी, तुमचं सगळं चांगलं चाललं आहे. तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात! पण तुम्ही देवेंद्र शिंदे, महाडिक, जाधव नाही, हीच चूक आहे..”

ADVERTISEMENT

हे वाचा >> Rupal ogre :संबंधास नकार दिल्याने…, एअर होस्टेस हत्याकांडात मोठा खुलासा

“खुद्द छत्रपती उदयनराजे देवेंद्रजींना एवढी आपुलकी देतात. त्यांची पाठ थोपटतात आणि आपण काय करतोय? काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आपल्या मराठा बांधवांना मारहाण झाली म्हणून आपल्याला आरक्षण देणाऱ्या, सुप्रीम कोर्टात तो लढा लढणाऱ्या नेत्यालाच शिव्यांची लाखोली वाहतोय. देवेंद्रजींचा दोष एवढाच का की ते ब्राह्मण आहेत? कुठे चाललोय आपण?”, असा प्रश्न आमदार बोर्डीकर यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

“आपला रोष साहजिक आहे, पण आपल्यासाठीच काम करणाऱ्या नेत्याला आपण नकारात्मक भावनेने बोलतोय. आपले शत्रू कोण आणि हितचिंतक कोण हे ओळखण्याचा हा काळ आहे. विश्वास ठेवा! मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजित दादांना आपले प्रश्न कळतात. आपले शत्रू कोण आणि हितचिंतक कोण, हे ओळखायला आपण शिकले पाहिजे”, असे आमदार मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT