Maharashtra Breaking News Live : कोकण रेल्वे अजूनही ठप्प, रेल्वे बोगद्यातील पाण्याने कोकण रेल्वे कोलमडली
Maharashtra Weather Forecast : विधान परिषद निवडणूक २०२४ अपडेट्स, महाराष्ट्र आणि मुंबई, पुण्यातील हवामानाचा अंदाज आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra Breaking news Updates : विधान परिषदेच्या रिक्त ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. आमदार फुटणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. यासंदर्भातील ताजे अपडेट्स वाचा....
ADVERTISEMENT
Maharashtra Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील हवामानाच्या अंदाजासह सर्व महत्त्वाच्या घडामोडीचे अपडेट्स वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ADVERTISEMENT
- 11:03 PM • 10 Jul 2024
Maharashtra Rain Update: कोकण रेल्वे अजूनही ठप्प
कोकण रेल्वे महामार्गावर पेडणे येथे बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वेची संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या वेगळ्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. याबाबत आता संतोष कुमार झा अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे यांनी माहिती दिली आहे.
बोगद्यातील जमिनीतून येणारे पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी कोकण रेल्वेचे 100 कर्मचारी, 25 सुपरवायझर व तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळावर उपस्थित आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ त्या ठिकाणी पोहोचत असून जमिनीतून येणारे पाणी थांबवण्यात आपल्याला आज सायंकाळपर्यंत सात-आठ वाजेपर्यंत यश येईल असे झा यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही बोगद्यातील पाणी थांबलेलं नसल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होऊ शकलेली नाही.
- 04:25 PM • 10 Jul 2024
Jayan Patil News : "तुमच्याकडे २०६ आमदारांचे बहुमत, त्यामुळे...", जयंत पाटलांनी महायुतीचे टोचले कान
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावरून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावरून जयंत पाटलांनी सत्ताधारी महायुतीला खडेबोल सुनावले.
जयंत पाटील म्हणाले...
"९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब केलं. महाराष्ट्राच्या माथ्यावर ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड मारण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केला आहे."
"काल सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यापूर्वीही दोन बैठका झाल्या होत्या. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली होती. काल आरक्षणाच्या मथळ्याखाली बैठक बोलावण्यात आली होती. विधानपरिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने या बैठका घेणे अपेक्षित होते. तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही."
"सरकारने मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडे २०६ आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचे काही कारण नाही."
"आजच्या पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य केलेल्या आहेत. ६ लाख ७० हजार कोटींचे एक बजेट मांडून, दुसऱ्या मिनिटाला ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. ही महाराष्ट्रात आर्थिक गोंधळ निर्माण करणारी प्रवृत्ती आहे."
- 02:51 PM • 10 Jul 2024
शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना दिली 'गुड न्यूज'; महागाई भत्त्यात किती वाढ?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेध लागलेला निर्णय अखेर शिंदे सरकारने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने ४ टक्के वाढ केली आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेतील मूळ वेतनावर देऊ असलेल्या महागाई भत्ता आता ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर गेला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलैच्या वेतनात वाढीव भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
- 10:54 AM • 10 Jul 2024
Konkan Railway Latest News in Marathi : कोकण रेल्वे ठप्प! कधीपर्यंत होणार सुरू?
तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा कोकण रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. मंगळवारी (९ जुलै) बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वेची गोव्याला जाणारी वाहतूक बंद झाली होती.
मंगळवारी (९ जुलै) रात्री साडेदहा वाजेनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. मात्र, बुधवारी (१० जुलै) पहाटे पुन्हा ट्रॅकवर माती आणि चिखल जमा होण्यास सुरुवात झाल्याने वाहतूक बंद करण्यात आली.
माती आणि चिखल हटवण्यासाठी पूर्ण दिवसाचा कालावधी लागेल, असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाडगे यांनी सांगितले आहे.
कोकण रेल्वे विस्कळीत झाल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
- 09:52 AM • 10 Jul 2024
भाजपला मराठवाड्यात धक्का, किन्हाळकरांनी दिला राजीनामा
सूर्यकांता पाटील यांच्या पाठोपाठ राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
माधव किन्हाळकर यांनी पक्ष सोडल्याने हा भाजपला महत्त्वाचा धक्का मानला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी माधव किन्हाळकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. माधव किन्हाळकर यांचे भोकरमध्ये चांगले वचर्स्व आहे. आगामी विधानसभा निवडणूक ते लढवू शकतात.
- 09:43 AM • 10 Jul 2024
konkan railway live status :
गेल्या काही काळापासून पेडणे येथील बोगद्यामध्ये पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून बंद असलेली कोकण रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे. पाहिली ट्रेन पेडणे बोगद्यातून 22:34 वाजता रवाना झाली. विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना झाल्या आहेत, अशी अधिकृत माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.
- 08:18 AM • 10 Jul 2024
MLC Election : ठाकरेंचे आमदार राहणार मुंबईतील हॉटेलमध्ये
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने तीन उमदेवार रिंगणात उतरवले आहेत. आमदार विरोधी पक्षाच्या गळाला लागू नये म्हणून सर्वच राजकीय पक्ष सावध झाले आहेत. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे.
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपल्या आमदारांची व्यवस्था मुंबईतील परळ येथील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. हॉटेल आयटीसीमध्ये ठाकरेंचे उमेदवार थांबणार आहेत.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेने मिलिंद नार्वेकर, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT