Vidhan Parishad Election : मविआ विरुद्ध महायुती... कुणाचा उमेदवार पडणार?
Mlc election 2024 : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 1 उमेदवार पराभूत होणार, हे निश्चित आहे. पण, पराभूत होणारा उमेदवार महायुतीचा असेल की, महाविकास आघाडीचा, याबद्दल राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महायुतीचे ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

महाविकास आघाडीकडून तीन जणांना उमेदवारी

विधान परिषद निवडणुकीत मोठी चुरस
Maharashtra vidhan parishad election : 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. महायुतीचे 9 उमेदवार, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. जागा 11 आणि उमेदवार 12 अशी स्थिती असल्याने पराभूत होणारा तो एक उमेदवार कोण असेल, याबद्दल राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. (9 candidates of Mahayuti and 3 candidates of Mahavikas Aghadi are contesting the Maharashtra Legislative Council elections 2024)
भाजपने 5, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 2 असे महायुतीने 9 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत उतरवले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचेही 3 उमेदवार (काँग्रेस 1, शिवसेना UBT 1, आणि शेकाप 1) निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीची चुरस वाढली असून, आमदारांची फोडाफोडी होणार, हे जवळपास निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात खासगी सांगितले जात आहे.
Vidhan Parishad Election : विधानसभेतील संख्याबळ किती?
भाजप
103 + अपक्ष आणि मित्रपक्ष 8 = 111
23 x 5 = 115 (-4)