Bhupinder Jogi : 5 वर्ष जुन्या VIDEO ची एवढी का चर्चा? ‘ही’ आहे रिअल स्टोरी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

who is bhupinder jogi viral in social media bhopal man viral video
who is bhupinder jogi viral in social media bhopal man viral video
social share
google news

Bhupinder Jogi Viral Story : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर #BhupinderJogi ट्रेंड करतंय. हे आपसूकच एका व्यक्तीचे नाव आहे. पण सोशल मीडियावर नेहमीच प्रसिद्ध लोकांची नाव चर्चेत असतात. त्यामुळे भूपेंदर जोगीचे (Bhupinder Jogi) नाव का चर्चेत येतंय? त्याच्या नावाने इतके मीम्स का व्हायरल होतायत? सोशल मीडियाच्या दुनियेत त्यांनी नेमकी अशी कोणती क्रांती केली आहे? ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्यामुळे जाणून घेऊयात भूपिंदर जोगी सोशल मीडियावर व्हायरल होण्याची संपूर्ण कहानी…(bhupinder jogi viral story social media bhopal)

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर सध्या #BhupinderJogi ट्रेंड करतंय. या ट्रेंडखाली अनेक मीम्स बनून व्हायरल केले जात आहे. तसेच भूपेंदर जोगीचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र भूपेंदर जोगीचीच चर्चा आहे. या तरूणाच्या व्हायरल होण्यामागची कहानी 5 वर्ष जूनी आहे. त्यामुळे 5 वर्षापूर्वी त्याने नेमकं काय केलेले हे जाणून घेऊयात.

हे ही वाचा : Sachin Pilot-Sara Love Story : घरच्यांचा विरोध तरीही…; पायलटांची ‘सैराट’ लव्ह स्टोरी

व्हायरल व्हिडिओत काय?

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा भूपेंदर जोगीचा हा व्हिडिओ 5 वर्ष जुना आहे. आता 5 वर्ष जुना व्हिडिओ नेटकऱ्यांना का आवडलाय? असा साहजिक प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर भुपेंदर जोगीचा हा व्हिडिओ 2018 साली मध्य प्रदेश निवडणूकी दरम्यान शुट करण्यात आला होता. या निवडणूकी दरम्यान लल्लनटाप रस्त्यावर उतरून जनतेची प्रतिक्रिया घेत होती. यावेळी राज्यातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले असल्याच्या भाजपच्या दाव्यावर जनतेला प्रतिक्रिया विचारल्या होत्या. यावेळी या प्रश्नांना मजेशीर उत्तर देताना भूपेंदर जोगी घरा-घरात व्हायरल झाला होता.

हे वाचलं का?

तुमचं नाव काय- भूपेंदर जोगी…

लल्लनटाप जनतेशी चर्चा करत असताना एक तरूण म्हणाला, अमेरीकेपेक्षाही चांगले रस्ते इथे (भारतात) आहेत. त्याचे हे उत्तर ऐकूण लल्लनटॉपने त्याचे नावचं विचारले, तो म्हणाला, भूपेंदर जोगी. यावेळी त्याला विचारण्यात आलं, अमेरीकेत कुठे फिरला आहेस? भूपेंदरने उत्तर दिले, खुप फिरलोय. यावर त्याला पुन्हा विचारण्यात आले. अमेरीकेत ज्या ठिकाणी फिरला आहेस, त्या ठिकाणची नावे सांग, तर त्यानी उत्तर दिलं…भूपेंदर जोगी…त्याच्या उत्तराने आजूबाजूचे सर्वच लोटपोट हसायला लागले. भूपेंद्रने केलेल्या दाव्याने आणि भन्नाट उत्तरामुळे त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : जरांगेंना आवाहन, सर्वपक्षीय बैठकीत काय झाला ठराव?

ADVERTISEMENT

इंटरनेटवर भन्नाट मीम्सचा पाऊस

भूपेंदर जोगीचा हाच व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करून अनेक जण मीम्स शेअर करत आहेत. एका युझऱने इंटरनेटवर लिहले की, आयुष्यात जर कठीण काळ आला तर भूपेंदर जोगी सारखा कॉन्फिडेन्स घेऊन लढलं पाहिजे. दुसऱ्या एका युझरने जोगीचा फोटो पोस्ट करून लिहले, शाळेच्या तोंडी परीक्षेत भूपेंदर जोगी सारख्या कॉन्फिडेन्सने, एकचं उत्तर सारखं सारखं देतो.

ट्रेंड होण्यामागचं कारण काय?

भूपेंदर जोगीचा व्हिडिओ अनेक कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेच आहेत. एक तर ज्याप्रमाणे भूपेंदर जोगी कोणत्याही प्रश्नाला थेट उत्तर देतोय, हे नेटकऱ्यांना आवडले आहे. तसेच अमेरीकेत न फिरून देखील दिलेल्या उत्तरावरून नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर उचललं आहे. त्यामुळे तो इंटरनेटवर चर्चेत आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT