‘त्या’ आईची एकच फाईट, मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडला घडवली अद्दल, व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

woman and ex girlfriend 50 cage fight with son 19 year old ex girlfriend in poland watch viral video
woman and ex girlfriend 50 cage fight with son 19 year old ex girlfriend in poland watch viral video
social share
google news

Viral News: एका महिलेने आपल्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडबरोबर (X girlfriend) बॉक्सिंग खेळत (Boxing) तिच्याबरोबर झालेल्या लढतीत त्या महिलेने बॉक्सिंगची लढतही त्यांनी एकहाती जिंकली आहे. या बॉक्सिंगच्या लढतीत 50 वर्षांच्या मालगोर्झाटा झ्वियरझिन्स्का विरूद्ध 19 वर्षांची निकोला अलोकिन होती. त्या लढतीचा आता एक व्हिडिओही व्हायरल (Video Viral) झाला आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंटही टाकल्या आहेत. या लढतीत लोकांना वाटले होते की निकोला ही लढाई जिंकणार आहे. पण मालगोर्झाटासमोर ती कमकुवत ठरली आहे. त्यानंतर मात्र मालगोर्झाटा तिच्या माजी प्रियकराच्या आईनेही तिला अद्दल घडवत तिला बाहेर फेकून दिले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Manoj Jarange: ‘एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय, त्यांनीच..’, जरांगे-पाटील संतापले; तुफान टीका

एक्स गर्लफ्रेंडला धडा

निकोला या बॉक्सिंगच्या लढतीत पहिल्यापासूनच हल्ला करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र तिचे ते प्रयत्न निष्पळ ठरत होते. या लढतीत दोघांनी एकमेकांना काही ठोसेही एकमेकींना दिले आहेत. मात्र नंतरच्या मालगोर्झाटाकडून चाल करत निकोलावर थेट हल्ला चढवण्यात आला. डेली स्टारच्या वृत्तानुसार एका महिलेने तिच्या निम्म्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीवर मात केल्याने हा लढा पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रियकराच्या आईच्या रागापुढे एक्स गर्लफ्रेंडचे काहीही चालले नसल्याचेच त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यांच्या या बॉक्सिंगचा व्हिडीओ X वर @DramaAlert नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

 

हे वाचलं का?

युजर्संकडून दिला पुरस्कार

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत 2.3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर त्या व्हिडीओला 19 हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. त्यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मुलाचे मन तोडल्यानंतर तुम्ही कोणत्याही आईशी पंगा घेऊ नका.’ तर आणखी एका युजरने म्हटले की, ‘देवाचे आभार मानले पाहिजे की, त्या ठिकाणी चप्पल घालण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, नाहीतर त्यामुळे मोठा रक्तपात घडला असता.’ तर आणखी एका युजर्सने त्याला कमेंट टाकले की, ‘बदला घेण्याची हीच योग्य संधी होती. तर ही व्हिडीओमध्ये दिसते आहे ती, वयाच्या 50 व्या वर्षी असणारा राग आणि संतापच त्यातून दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही?, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT