Mumbai Tak /बातम्या / Accident : शेगावला जाताना काळाचा घाला; ‘समृद्धी’वर ६ गजानन भक्तांचा मृत्यू
बातम्या शहर-खबरबात

Accident : शेगावला जाताना काळाचा घाला; ‘समृद्धी’वर ६ गजानन भक्तांचा मृत्यू

Shegaon | Samruddhi Highway | Accident :

बुलढाणा : शेगावला जाणाऱ्या भाविकांची भरधाव गाडी उलटल्याने ६ ठार तर ६ गंभीर जखमी झाले. आज (रविवारी) सकाळी मेहकर-सिंदखेड राजादरम्यान, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा जवळ घडलेल्या या घटनेत ४ जणांचा जागीच तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर ७ जखमींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयातील उपचारानंतर छत्रपती संभाजी नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. (Accident: On the way to Shegaon to visit Gajanan Maharaj)

मृतांमध्ये हाैसाबाई भरत बर्वे (वय ६५), श्रद्धा सुरेश बर्वे (वय २८), किरण राजेंद्र बाेरुडे (वय २८), प्रमिला राजेंद्र बाेरुडे (वय ५२), भाग्यश्री किरण बाेरुडे (वय २५), जान्हवी सुरेश बर्वे (वय ११) सर्व रा. एन ११ हुडकाे, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील बाेरुडे आणि बर्वे कुटुंबीय शेगाव येथे इर्टिगा कारने (MH 20 FU 8962) रविवारी सकाळी जात हाेते़. मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार पलटली. ३ ते ४ वेळा पलटी खाल्ल्याने कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली़. यामध्ये ४ जण जागीच ठार तर २ जणांचा मेहकर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

या अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात हलवले़. जखमींमध्ये कार चालक सुरेश भरत बर्वे (वय ३५), नम्रता रविंद्र बर्वे (वय ३२), इंद्र रविंद्र बर्वे (वय १२), साैम्य रविंद्र बर्वे (वय ४ वर्ष), जतीन सुरेश बर्वे (वय ४ वर्ष), वैष्णवी सुनील गायकवाड (वय १९ वर्ष), यश रविंद्र बर्वे (वय १०) आदींचा समावेश आहे़. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी पाेलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पाहणी केली.

---------
मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?