Mumbai Pune Expressway Accident: कारचा चुराडा, शीर झालं धडावेगळं; 3 जागीच ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Pune Expressway Accident Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार मालवाहू ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. हा अपघात इतका विचित्र होता की, एका प्रवाशाचं शीर धडापासून वेगळं झालं. (Three Died in car truck accident on mumbai pune expressway)

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. एक भरधाव कार कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. यात कारमधील तिघांनी जागेवरच प्राण सोडला. अपघातात मरण पावलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर कुठे आणि कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील आढे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (MH 04, JM 5349) वेगात होती. कारच्या समोर कोळसा घेऊन जाणारा ट्रक होता. भरधाव कार जाऊन मालवाहू ट्रकवर आदळली. अर्धी कार ट्रक मागच्या बाजूने खाली गेली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बोनेटचा चक्काचूर, डोकंच उडाल, मृतदेह फसले; थरकाप उडवणारं दृश्ये

अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलिसांनी लागतीच घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की कारचं बोनेट पूर्णपण ट्रक खाली गेलेलं होतं आणि चुराडा झालेला होता. चालक आणि चालका शेजारील सीटवर बसलेले दोघे पूर्णपणे अडकून पडले होते. अंगाचा थरकाप उडवणारी बाब म्हणजे चालकाशेजारच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचं शीरचं चिरडून धडावेगळं झालं होतं.

ADVERTISEMENT

कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. चक्काचूर झालेल्या कारमध्ये मृतदेह पूर्णपणे फसलेले होते. कर्मचाऱ्यांनी हे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

ADVERTISEMENT

तीन मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, त्यांचं नाव विजय विश्वनाथ खैर आहे. ते सातारा जिल्ह्यातील असून, इतर दोघांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT