भगतसिंह कोश्यारींना हटवण्यासाठी उदयनराजे करणार ‘महाराष्ट्र बंद’?
-इम्तियाज मुजावर, सातारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यपाल हटवण्याची मागणी केलेली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजेंनी पत्रकार परिषद बोलवली […]
ADVERTISEMENT

-इम्तियाज मुजावर, सातारा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यपाल हटवण्याची मागणी केलेली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजेंनी पत्रकार परिषद बोलवली असून, यात महाराष्ट्र बंदची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिलीये.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलीये.
उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली होती. त्यात 28 तारखेपर्यंत वाट बघू असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, अद्याप सरकारकडून छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.