Vishalgad Violence : हिंसा करणाऱ्यांना न रोखण्याचे पोलिसांनी कोर्टाला सांगितलं कारण

विद्या

Vishalgad controversy : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर काही समाजकंटकांनी हिंसाचार केला. या प्रकरणी आता कोर्टात प्रकरण सुरू असून, पोलिसांनी कोर्टाला दिलेली माहिती धक्कादायक आहे. 

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Vishalgad controversy : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर काही समाजकंटकांनी हिंसाचार केला. या प्रकरणी आता कोर्टात प्रकरण सुरू असून, पोलिसांनी कोर्टाला दिलेली माहिती धक्कादायक आहे. 

social share
google news

Vishalgad news marathi : कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार घडला होता. हिंसाचाराचा हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून, हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. विशाळगड अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी काही संघटनांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुर गावावर 14 जुलैला अचानक हल्ला केला होता आणि माणसांना मारहाण करत संपत्तीची नासधूस केली होती. 

हे संपूर्ण प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनीच जमावाला त्या दिवशी मोकळीक दिली, असा आरोप या प्रकरणात करण्यात आला. हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर, 'विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होते?' असा सवाल उच्च न्यायालयानेही केला. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची आहे? असे विचारत कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यानंतर उच्च न्यायालयाने शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्यांना न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आणि हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शाहूवाडी पोलीस स्टेशनकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या पत्रात पोलिसांनी विशाळगड प्रकरणात त्या दिवशी नेमके काय घडले हे 3 प्रमुख मुद्द्यांमध्ये सांगितले आहे. नेमके काय आहेत हे मुद्दे? नेमके काय आणि कसे घडले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून...

    follow whatsapp