Kalyan Lok Sabha : अजित पवारांना स्थान, शिंदे गायब... भाजप कार्यकर्त्यांनी ठरवलं तेच केलं!

मुंबई तक

Mahayuti : कल्याणमधील शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष अजूनही शमलेला नाही.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Kalyan Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच महायुतीत संघर्ष सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाचे भयंकर स्वरूप गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर दिसलं. हा संघर्ष कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच आमदार गणपत गायकवाड यांच्या विकासकामांच्या बॅनरवरून मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो नसल्याने पुन्हा या चर्चेने डोकं वर काढलं आहे. 

राज्यात ठिकठिकाणी महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही असंच चित्र आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून उफाळून येताना दिसत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर हे अधिक गंभीर झालं. आता पुन्हा एकदा याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. 

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर या प्रकणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

शिंदेंबद्दल नाराजी, बॅनर ठरलेत चर्चेचा विषय

गेल्या आठवड्यापासून आमदारांच्या निधीतून विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदारांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते केले जात आहे. पण, या कार्यक्रमाच्या बॅनर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

    follow whatsapp