Monkeypox कसा होतो, कोणती चाचणी करावी लागते आणि रुग्णाला क्वारंटाईन करावं लागतं का?
मंकी पॉक्स विषाणूने केरळमार्गे भारतात शिरकाव केला. सर्वप्रथम केरळातच ‘मंकी पॉक्स’चे रुग्ण आढळून आले. मंकी पॉक्स आजाराबद्दल सांगायचं झालं तर हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. रुग्ण २ ते ४ आठवड्यात बरा होतो. मात्र लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करु शकतो. त्यामुळे मंकी पॉक्सचा संसर्ग होऊ नये म्हणून काही गोष्टीबद्दल […]
ADVERTISEMENT

मंकी पॉक्स विषाणूने केरळमार्गे भारतात शिरकाव केला. सर्वप्रथम केरळातच ‘मंकी पॉक्स’चे रुग्ण आढळून आले. मंकी पॉक्स आजाराबद्दल सांगायचं झालं तर हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. रुग्ण २ ते ४ आठवड्यात बरा होतो. मात्र लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करु शकतो. त्यामुळे मंकी पॉक्सचा संसर्ग होऊ नये म्हणून काही गोष्टीबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे.
मंकी पॉक्स म्हणजे काय? (what is Monkypox)
– मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो या देशात आढळला होता. ‘ऑर्थोपॉक्स व्हायरस’ या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार होतो. तसंच काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये विषाणू आढळून आल्यामुळे हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहेत, असं संशोधनातून समोर आलंय.
मंकी पॉक्सची आजाराची लक्षणे काय? (monkey pox symptoms)
ताप येणं, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथी) सूज येणं, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणं, घाम येणं, घसा खवखवणं आणि खोकला या अशी लक्षणे साधारणत मंकी पॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये दिसून येतात. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव अणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समुदायामध्ये मंकीपॉक्स आजार गंभीर होण्याचा धोका असतो.
कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलिस दुसरी स्टेज, हँड, फूट माऊथ डिसीज इत्यादी मंकी पॉक्स सदृश इतर आजार आहेत. मंकी पॉक्स आजारामुळे न्यूमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टीपटलाचा संसर्ग (यामध्ये दृष्टी जाऊदेखील शकते) आदी गुतांगूत निर्माण होऊ शकते. या आजाराचा मृत्युदर सर्वसाधारणपणे ३ ते ६ टक्के आहे.