सोन्याच्या दरात पुन्हा झाली प्रचंड वाढ! तुमच्या शहरातील 22 अन् 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव वाचून धडकीच भरेल
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून देशभरात सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99 हजारांच्या पार झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून देशभरात सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99 हजारांच्या पार झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91 हजारांच्या जवळपास पोहोचले आहेत.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99850 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91540 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99880 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91550 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99880 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91550 रुपये झाले आहेत.









