Nagpur Crime: शेजाऱ्याचं अनुकरण करत गळफास लावण्याचा प्रयत्न केला, ११ वर्षांचा मुलगा जिवानिशी गेला
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर Nagpur Crime लहान मुलं कायमच अनुकरण करत असतात. मात्र ते कुठल्या गोष्टींचं अनुकरण करत आहेत याकडे लक्ष दिलं नाही तर अनर्थ ओढवू शकतो. नागपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजाऱ्याने गळफास घेतल्याचं पाहून एका ११ वर्षांच्या मुलाने तसाच प्रय़त्न केला आणि गळफास लागून त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
Nagpur Crime लहान मुलं कायमच अनुकरण करत असतात. मात्र ते कुठल्या गोष्टींचं अनुकरण करत आहेत याकडे लक्ष दिलं नाही तर अनर्थ ओढवू शकतो. नागपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजाऱ्याने गळफास घेतल्याचं पाहून एका ११ वर्षांच्या मुलाने तसाच प्रय़त्न केला आणि गळफास लागून त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या दफई किरणापूरमध्ये ही घटना घडली आहे.
साहिल मेश्राम असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. साहिलने शेजारी राहणाऱ्या अनिल नेवारेला दारूच्या नशेत गळफास घेतानना पाहिलं होतं. त्याचं अनुकरण करत गंमत म्हणून साहिलनेही गळफास लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नागपूर : अनेकांना फसवणारी ‘लुटेरी दुल्हन’ अखेरीस अटकेत