Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..
गुन्ह्यांची दुनिया बातम्या शहर-खबरबात

चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..

Chandrapur 15-year-old girl Pregnant: चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एक नववीच्या वर्गात शिकणारी 15 वर्षीय मुलगी गर्भवती (Pregnant) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने आपल्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जी गोष्ट सांगितली त्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागातील हा प्रकार विचार करायला लावणारा आहे. (chandrapur 9th class girl pregnant raped by 19 year old youth)

पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीच्या आईने तिला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथे उपस्थित असलेले डॉ. अचल मेश्राम यांनी मुलीची तपासणी केली. तपासणीनंतर त्यांना सुद्धा काहीसा धक्का बसला. कारण संबंधित मुलगी ही गरोदर होती. जेव्हा डॉक्टरांनी ही बाब मुलीच्या आईला सांगितली तेव्हा तिचेही भान हरपले.

त्यानंतर या घटनेची माहिती डॉ. अचल मेश्राम यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात दिली. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांमध्येही खळबळ उडाली. सुरुवातीला पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर गावातीलच 19 वर्षीय लोकेश चुद्री या तरूणाला अटक केलं आणि त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, ग्रामीण भागातून अशा घटना समोर येत असल्याने आता आश्‍चर्य व्यक्त केलं जात आहे. आजकाल लहान मूल असो वा प्रौढ, प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो आणि मोबाइलमध्ये इंटरनेट सुद्धा असतं. मुलं काय पाहत आहे हे त्यामुळे कोणालाही कळत नाही. मोबाइलवर मुलं काय पाहतात याकडे पालकांनी अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवणं गरजेचं झालं आहे. कारण मोबाइलच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ किंवा तत्सम सामुग्री ही सहजपणे उपलब्ध होतात. अशावेळी नकळत्या वयात पौगंडावस्थेतील मुला-मुलींकडून आकर्षणापायी काही चुका घडतात. ज्याचे त्यांना आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात.

Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत

सातवीतील विद्यार्थिनी 4 महिन्यांची गर्भवती, नववीतील विद्यार्थ्याकडून बलात्कार

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साताऱ्यातील देखील अशीच विचित्र घटना घडली होती. जिथे एक सातवीतील मुलगी गर्भवती राहिल्याचं समोर आलं होतं.

नववीत शिकणाऱ्या एका मुलाची सातवीतील मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री जमली होती. त्यानंतर दोघांना एकमेकांबाबत प्रेम वाटून लागलेलं. त्यानंतर मुलाने मुलीशी अधिकच सलगी साधली आणि तिच्यावर तिच्याच घरी बलात्कार केला. दरम्यान, बलात्कारानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना किंवा कोणालाही सांगितला नव्हता. पण त्यानंतर काही महिन्यांनी मुलीच्या मासिक पाळीबाबत तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे तपासणी केली. ज्यामध्ये डॉक्टरांना काही गोष्टींबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे डॉक्टरांनी मुलीच्या पालकांना मुलीची सोनोग्राफी करण्यास सांगितलं.

Crime: दारु, पॉर्न Video अन् 32 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत नको ते केलं!

जेव्हा सोनोग्राफीचा रिपोर्टसमोर आला तेव्हा डॉक्टरांना देखील धक्का बसला. कारण अवघ्या 13 वर्षांची मुलगी ही तब्बल 4 महिन्यांची गरोदर असल्याचं सोनोग्राफी रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी ही बाब मुलींच्या पालकांना सांगितली तेव्हा ते देखील हबकून गेले. अखेर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन नेमकं काय घडलं याबाबत विचारणा केली. तेव्हा मुलीने घडलेला नेमका प्रकार समोर आला.

डोंबिवलीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला २० वर्षांचा कारावास

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा