Crime : तरुणाई कुठे चालली? बारावीच्या मुलाला खुन्नस दिली… अकरावीतील तिघांवर चाकू हल्ला
वाशिम (ज़का खान) : खुन्नस दिल्याच्या राग मनात धरुन बारावीत शिकणाऱ्या मुलाने अकरावीत शिकणाऱ्या तिघांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये घडली आहे. हल्ला झालेल्या तिन्ही युवकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात संशयित आरोपी निखिल मेहरे (१९) आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांवर कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून […]
ADVERTISEMENT

वाशिम (ज़का खान) :
खुन्नस दिल्याच्या राग मनात धरुन बारावीत शिकणाऱ्या मुलाने अकरावीत शिकणाऱ्या तिघांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये घडली आहे. हल्ला झालेल्या तिन्ही युवकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात संशयित आरोपी निखिल मेहरे (१९) आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांवर कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात रेहान खान रहीम खान (१७) याने दिलेल्या तक्रारीतून मिळालेली अधिक माहिती अशी की, बिलाल याकूब कालूत (१७), गुलाब दस्तगीर खान (१८) असे दोन मित्र आहेत. हे तिघे जण रोज कॉलेजला सोबत जातात आणि सोबत परत येतात. या तिघांना बारावीतील निखील मेहरे (रा. कारंजा लाड) हा काही कारण नसतांना नेहमी येता जाता शिवीगाळ करत असतो.
ऑगस्ट २०२२ मध्ये विदयाभारती कॉलेजमध्ये अॅडमिशन सुरु असताना फिर्यादी रेहान खान आणि बिलाल कालूत रांगेत उभे होते. तिथं निखील मेहरेही उभा होता. त्यावेळी तिघांमध्ये काही कारणाने वाद झाला. तेव्हा निखीलने रेहना आणि बिलालला दादागिरी करून धमकाविले. अशात काल (शुक्रवारी) संध्याकाळी महेश भवनमध्ये ब्लुचिप कॉन्वेन्ट शाळेचा डान्स कार्यक्रम होता.