Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / मुंबई शहारली! बॉयफ्रेंडसाठी आईचे केले तुकडे, पोलिसांनी असा लावला छडा
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

मुंबई शहारली! बॉयफ्रेंडसाठी आईचे केले तुकडे, पोलिसांनी असा लावला छडा

Daughter killed mother in Mumbai : मुंबईच्या लालबागमध्ये हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 24 वर्षांच्या मुलीने बॉयफ्रेंडसाठी (Boyfriend) आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आईची (Mother) हत्या करून ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने तिचे तुकडे तुकडे करून कपाटात लपवले होते. चार महिन्यापुर्वीच तिने ही हत्या केली होती. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. (daughter killed her mother cut the body in pieces and kept in cupboard police investigation)

‘या’ कारणामुळे आईची हत्या

मुंबईत राहणाऱ्या रिंपल जैनचे दोन बॉयफ्रेंड (Boyfriend) होते. याच बॉयफ्रेंडवरून रिंपल आणि तीची आई विणा यांच्यात नेहमी भांडण व्हायची. याच भांडणाचा राग मनात धरून तिने आईची हत्या केली होती. या हत्येनंतर तिने मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. तिने डोके आणि धड शरीरापासून वेगळ करत प्लास्टीकच्या पिशवीत टाकून कपाटात ठेवले होते. तर हात आणि पायांचे तुकडे घरातल्या स्टीलच्या टाकीत ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान या हत्येची माहिती रिंपलने तिचे मामा आणि पोलिसांना (Police) वेगवेगळी सांगितली होती. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला होता.

सट्टेबाजांशी डीलचा प्लान, 1 कोटींची ऑफर, अमृता फडणवीसांनी सांगितलं सगळं प्रकरण

मामाला भाचीवर संशय

गेल्या 26 नोव्हेंबरला शेवटचं मी वीणाला तिच्या घरी भेटलो होतो, असे मामाने पोलिसांना (Police) सांगितले. त्यानंतर अनेकदा वीणाशी भेटायचा प्रयत्न केला असता रिंपल अनेक कारणे देऊन भेट घडवून आणायची नाही. अनेकदा रिंपलने ती बाहेर गेलीय, झोपलीय किंवा कानपूर गेल्याची कारणे द्यायची.त्यामुळे वीणाचा भावाने यावर विश्वास ठेवला. वीणाशी भेटच होत नसल्याने चिंतेत असलेल्या मामाने मंगळवारी आपल्या मुलाला वीणाच्या घरी पाठवले. त्यावेळेस रिंपलने त्याला घरीच येऊन दिले नाही. त्यामुळे संशय आणखीणच बळावला आणि त्यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तपासात पोलीसचं हादरले

मामाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा रिंपलच्या घरी जाऊन तपास केला असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांना घरी तपासा दरम्यान दुर्गंध येत होता. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता त्यांना कपाटात डोक आणि धड सापडलं आणि इतर अवयव घरातल्या टाकीत सापडले. घरात मृतदेहाचे तुकडे मिळून सुद्धा रिंपलने ते ओळखण्यास नकार दिला. मात्र मामाने तो मृतदेह वीणाचा असल्याचे ओळखले होते.

Crime : प्रेयसीसोबत रात्रभर लैंगिक संबंध अन् सकाळी सापडला मृतदेह…

पोलिसांना काय म्हणाली?

27 डिसेंबरला आई पायऱ्यांवरून कोसळल्याने ती जखमी झाली होती. त्यावेळी दोन जणांनी तिला घरी पोहोचवण्यास मदत केली होती. त्या दिवसापर्यंत आई जिवंत होती. मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला होता,अशी माहिती रिंपलने पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती तू मामाला दिली पाहिजे होती,असा पोलिसांनी तिला उलट सवाल केला होता. मात्र यावरही तिला व्यवस्थित उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर आणखीणच संशल बळावला.

दरम्यान या प्रकरणात आता रिंपलला पोलिसांनी (Police)अटक केली आहे. तसेच पोलिसांना तपासादरम्यान घरात इलेक्ट्रीक मार्बल कटर, कोयता आणि सुरी सापडली होती. या हत्याकांडात आता रिंपलच्या दोन्ही बॉयफ्रेंडचा हात होता का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

पुणे हादरलं, बायको, मुलाची हत्या केली अन् IT इंजिनिअरने…

---------
Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना