दाऊदचा भाचा अलीशाह पारकरचा ‘तो जबाब’ ज्यामुळे अडकले नवाब मलिक
ईडीला (Enforcement Directorate) महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एक जबरदस्त पुरावा मिळाला. त्याचं कारण आहे दाऊदचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर याच्या जबाबात ईडीला हा पुरावा मिळाला. ईडीने अलीशाहची चौकशी केली होती. या जबाबात जे अलीशाह पारकर म्हणाला त्याचमुळे गोवावाला कपाऊंडविषयी आणि नवाब मलिक हे अडकले, ईडीने त्यांना अटक केली. दाऊदची बहीण […]
ADVERTISEMENT

ईडीला (Enforcement Directorate) महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एक जबरदस्त पुरावा मिळाला. त्याचं कारण आहे दाऊदचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर याच्या जबाबात ईडीला हा पुरावा मिळाला. ईडीने अलीशाहची चौकशी केली होती. या जबाबात जे अलीशाह पारकर म्हणाला त्याचमुळे गोवावाला कपाऊंडविषयी आणि नवाब मलिक हे अडकले, ईडीने त्यांना अटक केली.
दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर हा मुंबईत राहतो. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आमि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. इंडिया टुडेनेच ही बातमी दिली होती. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.
काय म्हणाला अलीशाह पारकर?
“माझी आई दिवंगत हसीना पारकर ही गृहिणी होती. उदरनिर्वाहासाठी ती छोटे-मोठे आर्थिक व्यवहार करत होती. तिच्या मालकीच्या मालमत्तेतून तिला भाडे मिळत असे. साधारण ३ ते ५ लाख रूपये भाडे तिला मिळत होतं. माझी आई (हसीना पारकर) रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची. दाऊदची बहीण अशीही तिची ओळख होती. त्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही ती मिटवत होती.”