
मुंबईतल्या साकीनाका (Sakinaka) या ठिकाणी एका महिलेवर अत्यंत अमानुष बलात्कार करून नंतर त्या महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी मोहन चौटाला याला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलीये. न्यायालयाने त्याला सगळ्याच आरोपांमधे दोषी ठरवलंय. त्याला आज फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे.
काय घडली होती घटना?
दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या बलात्काराच्या घटनेनं मुंबई हादरली होती. मुंबईतील साकीनाका भागात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. साकीनाका भागातील खैराणी रोडवर ३० वर्षीय महिलेवर आधी बलात्कार करण्या आला. त्यानंतर तिच्यावर गुप्तांगात लोखंडी रॉड टाकल्याचा क्रूर प्रकारही नराधमाने केला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं होतं. तर आरोपी मोहित चौहाणला बेड्या ठोकल्या होत्या.
दरम्यान, पीडित महिलेला गंभीर अवस्थेत मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुप्तांगात रॉड घालण्यात आल्यानं महिलेची प्रकृती गंभीर होती. मात्र, डॉक्टरांनी तातडीने महिलेवर ऑपरेशन केलं. तब्बल दोन ते तीन तास ऑपरेशन सुरू होतं. त्यानंतर महिलेच्या प्रकृती सुधारण्याकडे डॉक्टराचं लक्ष लागलं होतं. मात्र, उपचारादरम्यान महिलेनं अखेरचा श्वास घेतला.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज समोर आलं. या फूटेजमध्ये आरोपींने महिलेवर बलात्कार करून क्रूर अत्याचार केल्याचं दिसत आहे. आरोपीनं बलात्कार केल्यानंतर महिलेच्या गुप्तांगात अनेक वेळा रॉड टाकण्याचा क्रूर आणि संतापजनक प्रकार केला. महिला अत्यवस्थ झाल्यानंतर आरोपीनं पीडितेला टेम्पो टाकून दिलं आणि फरार झाला. हे सगळं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार,इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर या विषावर चर्चा झाली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली होती.